
प्रतिनिधी: युपीआय (Unified Payment Interface UPI) व्यवहारात भारताने मोठे यश प्राप्त केले आहे.ऑगस्ट महिन्यात प्रथमच भारतातील युपीआय व्यवहारांची संख्या २० अब्जाहून अधिक संख्येने वाढल्याने ऐतिहासिक वाढ युपीआयने नोंदवली आहे. युपी आयच्या इतिहासात प्रथमच इतका आकडा एका महिन्यात गाठला गेला आहे. सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून ही माहिती दिल्याने ही कामगिरी अधोरेखित झाली आहे.एक्स अकाऊंटवरून विभागाने म्हटले आहे की,'पहि ल्यांदाच युपीआयने नवा उच्चांक प्रस्थापित केला ज्यामध्ये व्यवहारांची संख्या ऑगस्ट २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जी २० अब्ज नोंदवली गेली आहे. धन्यवाद भारत! देशाने डिजिटल पेमेंट प्रणालीत व डिजिटल क्रांतीला दुजोरा दिला आहे.पुढेही आप ण हा डिजिटल प्रवास कायम राखूयात' असे म्हटले आहे. याशिवाय युपीआय तंत्रज्ञानाची प्रणेती एनपीसीआयने (National Payments Corporation of India NPCI) आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून जुन, जुलै,ऑगस्ट महिन्यात दरमहा व्यवहार संख्येत (Transactions Volume) मध्ये मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२५ पर्यंत युपीआय व्यवहाराने २४.८५ लाख कोटींचा आकडाही पार केला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत व्यवहारात यंदा ३४% वाढ झाली आहे तर व्यवहाराच्या एकूण मूल्यात २१% वाढ झाली आहे. दिवसानुरूप विचार केल्यास, दरदिवशी ६४५ दशलक्ष व्यवहार केले असले तरी व्यवहारांचे मूल्यांकन ८०१७७ कोटी रुपये होते. जुलै महिन्यात व्यवहारांची संख्या १९.४७ अब्जावर गेली आहे. तसेच व्यवहारांचे मूल्यांकन २५.०८ लाख कोटींवर पोहोच ले आहे. इयर ऑन इयर बेसिसवर ही व्यवहारात ३५% वाढ असून व्यवहारांचे मूल्यांकन ८०९९१ कोटी रुपये आहे.
जुन महिन्यात, युपीआय व्यवहारांची संख्या १८.४० अब्ज झाली असून व्यवहारांच्या मूल्यांकनाची संख्या २४.०४ लाख कोटी झाली. आकडेवारीनुसार जुलै व ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत आकडेवारी संख्या कमी आहे. एकूणच युपीआय आकडेवारीत मोठी वाढ नों दवली गेली आहे. त्यामुळे आकडेवारी ही वाढलेल्या व्यवहारांची संख्या व वाढलेल्या व्यवहारांचे मूल्यांकन यातील वाढ दर्शवते. यापूर्वीही एसबीआयचा अहवाल जाहीर झाला होता ज्यामध्ये युपीआय व्यवहार व मूल्यांकन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.अहवालातील माहितीनुसार, दररोजचे सरासरी व्यवहार (Average Daily Transactions) जानेवारी महिन्यातील ७५७४३ कोटीवरून वाढत जुलै महिन्यात ८०९१९ कोटींवर पोहोचले आहे.
आघाडीच्या बँकेच्या खातेदारांकडून वाढलेला व्यवहारामुळे हा टप्पा गाठला गेला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक एसबीआयचा असून बँकेने ५.२ अब्ज युपीआय व्यवहार केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आ हे. येस बँकेचा दुसरा क्रमांक असून या बँकेने ८ अब्ज युपीआय व्यवहार केले आहेत. युपीआय आकडेवारीत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला असून एकूण युपीआय व्यवहारातील ९.८% हिस्सा महाराष्ट्राचा आहे. कर्नाटकचा युपीआय व्यवहारातील मार्केट शे अर ५.५% , युपीचा ५.३% आहे.