मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेचा फटका सातत्याने गुंतवणूकदारांना बसत असताना सलग चौथ्यांदा आजही सोन्यात वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २१ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅ म दरात २० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०६०९ रूपये, २२ कॅरेटसाठी ९७२५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७९५७ रूपयांवर पोहोचला आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरे ट सोन्याच्या प्रति तोळा दरात २१० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात २०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १६० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०६०९० रूपये, २२ कॅरेटसाठी ९८२५० रूपये, १८ कॅ रेटसाठी ७९५७० रूपयांवर गेले आहेत.
मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १०६०९ रूपये, २२ कॅरेटसाठी ९७२५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७९५७ रूपये आहेत. या किंमतीत जीएसटी व इतर खर्चाचा समावेश नाही. जागतिक स्तरावरील सोन्याच्या गोल्ड फ्यु चर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.४०% वाढ झाली आहे. तर जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.१८% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३४८२.१० औंसवर गेली आहे.आज दिवसभरात सोन्याचा दरात मो ठ्या प्रमाणात वाढ झाली होती. जगभरातील अस्थिरतेचा फटका सोन्यात बसल्याने तब्बल २% पर्यंत वाढ सोन्याच्या निर्देशांकात झाली होती. सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने, आगामी सप्टेंबर महिन्यातील युएस फेड व्याजदरात कपातीची अपेक्षा गुंतवणूकदारांनी ठेवल्याने, तसेच स्पॉट बेटिंगमध्ये वाढ झाल्याने दरपातळी वाढली होती. भारतीय सराफा बाजारातही सणासुदीच्या काळासह रूपयांत घसरण झाल्याने, भारतातील सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने तसेच ईपीएफ गुंतवणूकीत वाढ झाल्याने आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही सलग तिसऱ्यांदा वाढ कायम!
चांदीच्या दरातही आज सलग तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ०.१० रूपये वाढ झाली असून प्रति किलो दरात १०० रूपयांनी वाढ झाली आहे. परिणामी चांदीचे प्रति ग्रॅम दर १२६.१० रूपये, व प्रति किलो दर १२६१०० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम दर १३६१ रूपये व प्रति किलो दर १३६१०० रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.०४% इतकी वाढ झाली आहे.
आज दिवसभरात चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. टॅरिफ अस्थिरतेचा फटका चांदीच्या गुंतवणूकदारांना बसत असल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे. प्रामुख्याने आज दिवसभरात युएस बाजारातील सिल्वर फ्युचर बेटिंग (Spot) मोठ्या प्रमाणात वाढ ल्याने चांदीला मोठी मागणी प्राप्त झाली. याशिवाय रूपयात झालेल्या घसरणीमुळे आज भारतीय सराफा बाजारातील चांदीच्या सपोर्ट लेवलला धक्का बसल्याने चांदी महाग झाली आहे.