मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

  15

राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकासासाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने २०१९ पासून ‘सारथी’ ही संस्था सुरू केली. मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था म्हणून ‘शाहू विचारांना देऊ या गती, साधू या सर्वांगीण प्रगती’ या बोधवाक्याखाली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था शिक्षण, मार्गदर्शन, कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता, संशोधन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या सर्व क्षेत्रांत ६३ विविध उपक्रम राबवत आहे.


सारथी संस्थेमधील सन २०२१-२२ ते २०२४-२५ एकूण चार वर्षांमध्ये ८ लाख ३८ हजार ४७७ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला असून अनेक विद्यार्थी या संस्थेमार्फत मार्गदर्शन घेऊन विविध क्षेत्रात यश संपादन करत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शनावर आतापर्यंत ६४७ कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. सारथी संस्थेमधील विद्यार्थी दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निवडून येण्याचा नवीन उच्चांक निर्माण करत आहे. सारथीमार्फत विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी, मार्गदर्शन यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. सारथीच्या स्थापनेपासून २०२० ते २०२४ या कालावधीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षेमध्ये ११२ विद्यार्थी निवडून शासनामध्ये सेवा बजावत आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये २०२० ते २०२३ या कालावधीत १०४८ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून वर्ग एकमध्ये २२९ तर वर्ग दोन मध्ये ८१९ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. सारथीमार्फत राबविण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम हा महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुकास्तरावर राबवण्यात येतो. सध्या महाविद्यालयांमध्ये १७ हजार २५१ लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत. श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षण उपक्रम या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी नगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर येथे आयटीआय, पदविका व अभियांत्रिकी पदवी प्राप्त १०१२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यापैकी ६५७ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून ३१४ विद्यार्थ्यांना नोकरी लागली. महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना आज अखेर एकूण सहा कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती रकमेचा लाभ देण्यात आला आहे. सन २०२४-२५ मध्ये या योजनेअंतर्गत एकूण ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. देशातील नामवंत २०० विद्यापीठात शिकणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये शिक्षण शुल्क, लायब्ररी शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह शुल्क व भोजन शुल्काची १०० टक्के रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येते. सन २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये या योजनेअंतर्गत ४४१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन पाच कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सन २०२४-२५ मध्ये या योजनेसाठी २७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेसाठी मार्च २०२५ अखेर सहा कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.


सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेमध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये ३३० शेतकऱ्यांनी ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शेतकरी मावळा सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी ५०० असून २०२५ पासून हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. पशुधन संगोपन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत वर्षभरात एक हजार लाभार्थ्यांना उरळी कांचन येथील बायफ या संस्थेमार्फत ३० दिवसीय निवासी प्रशिक्षण, ६० दिवसीय प्रक्षेत्रिय प्रशिक्षण ८९ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. महाराणी साईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पुणे, वाशिम, कोल्हापूर, गडचिरोली, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर, नाशिक, पालघर, बीड, रत्नागिरी या जिल्ह्यात राबवला जातो. या सर्व जिल्ह्यांत एकूण १४१९ अभ्यासक्रम राबविले जात असून त्यापैकी ९८९ अभ्यासक्रम पूर्ण झाले आहेत. सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आयडीटीआर भोसरी पुणे येथे हलकी व जड वाहने चालवण्याचे ३० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. सन २०२५ मध्ये या प्रशिक्षणास सुरुवात झाली असून आत्तापर्यंत ४९ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा योजनेमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी विद्यार्थी व इयत्ता सहावी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत तीन लाख १६ हजार ५९२ इतके विद्यार्थी सहभागी झाले असून त्यापैकी ९४४४ इतक्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक प्राप्त केले. या स्पर्धांसाठी १७ लाख ९३ हजार रुपयांची पारितोषिक ठेवण्यात आली होती. आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविली जाते. छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत सन २०१९ पासून ते २०२३ पर्यंत ३०७८ विद्यार्थी योजनेसाठी पात्र होते. त्यापैकी ३९४ विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पूर्ण केली असून १०३ विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली आहे.


सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत इनक्युबेशन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून स्टार्टअप कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन व विद्यावेतन स्वरूपात आर्थिक साहाय्य दिले जाते. महाराष्ट्रातील शासनमान्य यादीपैकी १३ इनक्युबेशन केंद्राने सारथी संस्थेबाबत सामंजस्य करार केला आहे. सारथीमार्फत लाभार्थ्यांना एक वर्षासाठी इनक्युबेशन केंद्राकडे प्रायोजित केले जाते. सन २०२५ यावर्षी १२० लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. सारथी संस्थेमार्फत पात्र विद्यार्थ्यांना प्राधान्याने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज संकुल उभारण्यात येत आहेत. या इमारत बांधकामासाठी शासनाने मोफत जमिनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रत्येक संकुलामध्ये ५०० मुलांचे वसतिगृह, ५०० मुलींचे वसतिगृह, ३०० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, सारथी विभागीय कार्यालयांचा समावेश आहे. सारथीच्या पुणे येथील मुख्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून नवीन इमारतीमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. इतर विभागीय कार्यालयाची कामे प्रगतिपथावर असून लवकरात लवकर ती पूर्ण करण्यात येत आहेत. विभागीय कार्यालय पुणे, सारथी उपकेंद्र कोल्हापूर, विभागीय कार्यालय खारघर नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सारथी उपकेंद्र लातूर, विभागीय कार्यालय नागपूर, अमरावती यासाठी आठ जिल्ह्यांत वसतिगृह, अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात येणार आहेत.


मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेमुळे हजारो विद्यार्थी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शैक्षणिक बळ मिळत आहे. या समाजातील मागास घटकांना सक्षम, स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा व नवयुगाची आव्हाने पेलणारा समाज तयार करण्यामध्ये सारथी मोलाची भूमिका बजावत आहे. योग्य शिक्षण, दिशा आणि संधी मिळाल्यास यश मिळवता येते. हे स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम सारथी संस्था करत आहे. मराठा समाजातील गरजू, होतकरू युवक व युवती या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात दरवर्षी मोठ्या प्रमाणात यश संपादन करत आहेत. मराठा समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या समान संधी उपलब्ध करून विकासाच्या प्रवाहात अग्रेसर ठेवणारी सारथी नक्कीच या समाजासाठी एक दीपस्तंभ ठरत आहे.


- संध्या गरवारे - खंडारे
विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

Comments
Add Comment

पर्यावरणाचे भान ठेवा! बोला, गणपती बाप्पा मोरया!!

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत भारतीयांना एकत्र येण्यास आणि सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी

भारत-चीन संबंध नव्या वळणावर

अमेरिकेने लादलेल्या प्रचंड टॅरिफच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय सहकार्य परिषदेसाठी

हेकेखोरपणा ही एक मानसिकता

अनेकदा आपल्या आजूबाजूलासुद्धा आपण असे लोक बघतो जे कायम स्वतःच खरं करतात. अगदी कोणीही कितीही अनुभवी व्यक्तीने

सेमीकंडक्टर उत्पादनांत आत्मनिर्भरता येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राष्ट्राला संबोधित करताना या वर्षाअखेर देशातील पहिली सेमीकंडक्टर चिप

बेस्ट निवडणुकीतून संदेश

मुंबई . कॉम मागील आठवड्यातच राजकीय धामधुमीत एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. बेस्ट उपक्रमातील कर्मचारी

विद्यार्थ्यांनी मोबाइलचा अतिवापर टाळावा

मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. ही त्यांच्या भविष्याच्या