दहशतवाद जगासाठी मोठा धोका : पंतप्रधान मोदी

  20


बीजिंग : दहशतवादाला जगासाठी मोठा धोका असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ठणकावून सांगितले. चीनमधील तियानजिन येथे चालू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्यावेळी भाषण करताना तेथे उपस्थित असलेल्या पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासमोर मोदी यांनी ठाम भूमिका मांडली. पहलगाममध्ये जगाने दहशतवादाचा क्रूर चेहरा पाहिला. भारत अनेक वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहे आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर दुसऱ्या देशांची दुटप्पी भूमिका मान्य केली जाणार नाही, असे ते म्हणाले.





पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, “भारताने एससीओचा सक्रिय सदस्य म्हणून नेहमीच रचनात्मक आणि सकारात्मक भूमिका बजावली आहे. एससीओ संदर्भात भारताची दृष्टी आणि धोरण तीन महत्त्वाच्या स्तंभांवर आधारित आहे, एस सुरक्षा, सी जोडणी, ओ संधी.” ते म्हणाले, “सुरक्षा, शांतता आणि स्थिरता ही कोणत्याही देशाच्या विकासाची पायाभूत तत्त्वे आहेत. मात्र, दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी विचारधारा या मोठ्या आव्हाने आहेत. दहशतवाद केवळ एखाद्या देशासाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी एक सामूहिक आव्हान आहे. कोणताही देश, समाज किंवा नागरिक यापासून स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही. म्हणूनच भारताने दहशतवादाविरोधातील लढाईत एकतेवर भर दिला आहे.”


या परिषदेत चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्व नेत्यांचे स्वागत केले. २५व्या शिखर परिषदेची औपचारिक सुरुवात रविवारी रात्री जिनपिंग यांनी आयोजित केलेल्या भव्य भोजसह झाली. यावेळी पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इतर नेतेही सहभागी झाले. यंदाचा शिखर संमेलन एससीओ गटाचा सर्वात मोठा शिखर संमेलन मानला जात आहे, कारण यंदा अध्यक्षपद भूषवणाऱ्या चीनने ‘ एससीओ प्लस’ शिखर परिषदेसाठी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनियो गुतारेस यांच्यासह २० परदेशी नेते आणि १० आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे.


पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची मैत्रीपूर्ण भेट





पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे शांघाय सहयोग संघटना (एससीओ) शिखर परिषदेच्या समारोपानंतर झालेल्या द्विपक्षीय बैठकीसाठी एकाच कारमध्ये बसून एकत्र पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर (एक्स) एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. यासंदर्भातील ट्विटर पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की, “एसओसी शिखर परिषदेनंतर मी आणि अध्यक्ष पुतिन एकत्र द्विपक्षीय बैठकीच्या स्थळी गेलो. त्यांच्यासोबतची चर्चा नेहमीच ज्ञानवर्धक असते.”ही भेट दोन्ही देशांमधील मजबूत राजनैतिक संबंधांचे प्रतीक आहे. हा फोटो शेअर करताना पंतप्रधान म्हणाले की, “तियानजिनमध्ये भेटी सुरूच आहेत. एसओसी शिखर परिषदेदरम्यान अध्यक्ष पुतिन आणि अध्यक्ष शी यांच्याशी विचारांची देवाण-घेवाण केली.” पंतप्रधान मोदींनी एक आणखी फोटो शेअर केला, ज्यामध्ये ते आणि अध्यक्ष पुतिन हातमिळवणी आणि आलिंगन करताना दिसत आहेत. या फोटोसह मोदींनी लिहिले की, “अध्यक्ष पुतिन यांची भेट नेहमीच आनंददायी असते.”





Comments
Add Comment

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापूर, २० लाख नागरिक झाले बेघर

पंजाब : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापूर आला आहे. या पुरामुळे २० लाख नागरिक बेघर झाले आहेत. प्रशासन

शक्तिशाली भूकंपाने अफगाणिस्तान हादरले! अनेकांचा मृत्यू... दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले धक्के

कराची: रविवारी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री पाकिस्तान सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात तीव्र भूकंपाचे

मोदी-जिनपिंग-पुतिन... SEO शिखर परिषदेत त्रिकूटांचे जमले! हस्तांदोलन करत मैत्रीपूर्ण पद्धतीने झाली चर्चा

शांघाय: रविवारपासून चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SEO) शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे.

२०२६ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार

पंतप्रधान मोदींनी पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित

पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष यांच्या चर्चेत काय ठरले ?

तिआनजिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची शांघाय कॉऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या शिखर

युक्रेनच्या माजी संसद सभापतींची गोळ्या घालून हत्या

ल्विव्ह: पश्चिम युक्रेनमध्ये एका प्रमुख युक्रेनियन राजकारणी आणि माजी संसद सभापतींची अज्ञात हल्लेखोरांकडून