Thursday, September 25, 2025

शेअर बाजारात सकाळच्या सत्रात वाढ मात्र 'यावर' लक्ष देणे महत्वाचे सेन्सेक्स २९६.१७ व निफ्टी ८९.८० अंकाने उसळला

शेअर बाजारात सकाळच्या सत्रात वाढ मात्र 'यावर' लक्ष देणे महत्वाचे सेन्सेक्स २९६.१७ व निफ्टी ८९.८० अंकाने उसळला

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सकाळीही गिफ्ट निफ्टीत वाढ झाली होती. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २९६.१७ अंकाने व निफ्टी ८९.८० अंकाने वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिं गपींग यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. याशिवाय युएस बाजारातील नवीन समाधानकारक आकडेवारीमुळे शेअर बाजारात वाढ झाली आहे. इतकेच नाही तर आगामी युएस भारत यांच्यातील टॅरिफ बोलणीला वेग येऊ शकतो या गुंतवणूकदारांच्या भावनेने बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २००.२८ अंकांने व बँक निफ्टीत १४२.२० अंकांने वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४०%,०.८६% वाढ झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.१२%,१.०६% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Secto ral Indices) मध्ये एफएमसीजी (०.१८%) , मिडिया (०.१३%) वगळता इतर निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ सकाळच्या सत्रात मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.४१%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (१.२७%) समभागात झाली आहे.

सकाळच्या सत्रात आज युएस भारत यांच्या आगामी बोलणीसह चीन व भारत यांच्यातील यशस्वी चर्चेमुळे खूप कालावधीनंतर शेअर बाजारात प्रफुल्लित वातावरण निर्मिती झाली. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाय झेशन (SCO) उपस्थिती दर्शविली असून दोन्ही देशांनी अनेक व्यापारी व सीमेच्या मुद्यावर संमती दर्शवली आहे. भारत व चीन दोन्ही देश जागतिक अर्थकारणात मोलाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा यावेळी दोन्ही पक्षांनी व्यक्त केली. याखेरीज डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीला युएस न्यायालयाने असंविधानिक ठरवल्यानंतर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र वाढीला मनमानी ठरवली असली तरी फेडरल न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे संबंधित हालचालींवर गुंतवणूकदार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याशिवाय रविवारी उशीरा आशियाई पॅसिफिक बाजारात चीनच्या रेटिंग डॉग (Rating Dogs) मधील समाधानकारक आकडेवारीनंतर सुरूवातीच्या कलात आशियाई बाजारात गुंतवणूकदारांचा संमिश्र कल नोंदवला गेला आहे. या आकडेवारी त पीएमआय (Product Manufacturing Index PMI) मध्ये जुलै महिन्यातील ४९.३ तुलनेत ऑगस्टला ४९.४ पातळीवर उत्पादनात वाढ झाल्यानंतर आशियाई शेअर बाजारात आश्वासक चित्र निर्माण झाले.

युएस शेअर बाजारात डाऊ जोन्स (०.००%), एस अँड पी ५०० (०.६४%), नासडाक (०.६४%) तिन्ही बाजारात घसरण झाली होती. तर आगामी महागाई आकडेवारीकडे युरोपियन गुंतवणूकदारांचे लक्ष लागल्याने युरोपातील एफटीएसई (०.३२%), सीएसी (०.७६ %), डीएएक्स (०.५८%)या तीनही बाजारात घसरण झाली होती. आज सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात आशियाई बाजारात गिफ्ट निफ्टी (०.४१%), स्ट्रेट टाईम्स (०.०८%), हेगंसेंग (१.९६%), सेट कंपोझिट (०.३५%), शांघाई कंपोझिट (०.२६%) बाजारात वाढ झाली असून घसरण निकेयी २२५ (१.६३%),कोसपी (१.४३%), जकार्ता कंपोझिट (०.७६%), तैवान वेटेड (०.८१%) निर्देशांकात घसरण झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ ओला इलेक्ट्रिक (७.६२%), गोदावरी पॉवर (६.२१%), जीएमडीसी (५.०५%), आनंद राठी वेल्थ (४.०५%), चोला फायनांशियल (४.४७%), एमसीएक्स (४.२८%), बीएसई (४.०४%), हिंदुस्थान झिंक (३.४९%), गार्डन रीच (३.६ १%) समभागात (Stocks) मध्ये झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण औथुम इन्व्हेस्ट (३.९०%), वर्धमान टेक्सटाईल (३.१९%), युनायटेड ब्रेवरीज (२.५९%), वारी एनर्जीज (२.२९%), पिरामल एंटरप्राईजेस (१.८७%), करूर वैश्य बँक (१.७७%), अजंता फार्मा (१.४१%), जेएसडब्लू होल्डिंग्स (१. १३%), त्रिवेणी इंजिनिअरिंग (१.०८%) समभागात झाली आहे.

त्यामुळे आज बाजारात किरकोळ वाढ अपेक्षित असली तरी बँक निर्देशांकासह निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील हालचाल पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच आगामी जीएसटी काऊन्सिल बैठकीच्या पार्श्वभूमीसह देशातील आगामी एचएसबीसी पीएमआय डेटा पाहणे गुंतव णूकदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment