
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर वाढीत झाली आहे. प्रामुख्याने लार्जकॅपसह मिडकॅप व स्मॉलकॅप मध्ये प्रचंड मोठी वाढ झाल्याने आज बाजारात शेअरची दरपातळी राखली गेली परिणामी आज बाजारात मोठी रॅली झाली आहे. सेन्सेक्स ५५४.८४ अंकाने व निफ्टी १९८.२० अंकाने वाढ झाल्याने सेन्सेक्स ८०३६४.४९ व निफ्टी २४६२५.०५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.६४%,१.४९% वाढ झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.९७%, १. ५७% वाढ झाली आहे.सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४०८.४७ व बँक निफ्टीत ३४६.८० अंकाने वाढ झाली आहे. क्षेत्रीय निर्देशांकातील मिडिया (०.३२%),फार्मा (०.१२%) वगळता इतर निर्देशांकात वाढ झाली आहे ज्यामध्ये दिवसभरात सर्वाधिक वाढ ऑटो (२.८०%) मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (२.१२%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.८१%), कंज्यूमर ड्युरेबल्स (२.०८%), तेल व गॅस (१.३५%) निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे.
विशेषतः आजच्या दिवसात चीन व भारत यांच्यातील व्यापार व सीमा सुरक्षेवर यशस्वी चर्चा झाल्याने गुंतवणूकदारांकडून दोन महाशक्ती एकत्र येण्याच्या संभाव्यतेमुळे मोठा प्रतिसाद बाजारात मिळाला. पंतप्रधान मोदी ३१ ऑगस्ट व आज १ सप्टेंबर या दोन दिवसी य शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेला हजेरी लावली होती. चीन राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विस्तृत चर्चा झाली. तसेघ जिंगपींग यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत 'भारत व चीन' या दोन महाशक्ती आहेत असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आशियाई गुंतवणूकदारांचा विश्वास यानिमित्ताने बळकट झाला. चीनमध्ये आलेल्या रेटिंग डॉगमधील उत्पादन वाढीच्या नव्या अहवालानंतर बाजारात गुंतवणूक वाढवण्यात आली. याशिवाय आज जाहीर झालेल्या एचएसबीसी पीएम आय निर्देशांकात १८ वर्षातील सर्वाधिक वाढ बाजार तासांच्या दरम्यान जाहीर झाल्याने परकीय गुंतवणूकदारांचा (Foreign Institutional Investors FII) ओढा गुंतवणूक काढण्यापासून रोखला गेला असण्याची शक्यता होती. तसेच आगामी काळातील युएस मधील बेरोजगारी, उत्पादन आकडेवारीही बाजाराला नवी दिशा देण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. आज शेअर बाजारात ऑटो क्षेत्रातील समभागात (Stocks) झालेली वाढ हा महत्त्वाचा ट्रिगर होता. बजाज ऑटो, अशोका लेलँड अशा नामांकित कंपनीच्या विक्री त ५% वाढ नोंदवली गेली असल्याने तसेच ऑटोमोबाईल वस्तूंवर १२% वरून जीएसटी ५% होण्याची शक्यता असल्याने यात वाढ झाली. याशिवाय आयटी, फायनांशियल सर्विसेस समभागात झालेल्या वाढीचा फायदा निर्देशांकात परावर्तित झाला. आज अखेरच्या सत्रापर्यंत भारतीय अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ३.९१% घसरल्याने आजही बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे. आज ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही मोठी वाढ झाली ज्यामध्ये बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, हिरो मोटोकॉ र्प, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, ट्रेंट, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक अशा बड्या शेअरचा समावेश होता. दुसरीकडे सन फार्मा, एचयुएल, आयटीसी, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने निर्देशांकातील रॅली मर्यादि त राहिली आहे.
तसेच फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुकला काढून टाकण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न हा एक असा डाव आहे जो अशा संस्थेसाठी एक भूकंपीय बदल घडवून आणेल ज्याला राजकारणापेक्षाही वरचे मानले युएसमध्ये मानले जात आहे. तसेच फेड रल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का नाही ही शंका कायम असताना कुक यांंना कथित 'मॉर्गज' घोटाळ्याप्रकरणी आरोपी करत त्यांची हकालपट्टी केली होती. तज्ञांनी याआधीही अमेरिकेतील आर्थिक अस्थिरतेचे वर्णन वेळोवेळी केले होते याच धर्तीवर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ट्रम्प यांच्या या कृतींमुळे केवळ फेड अधिक राजकीय बनण्याची धमकीच नाही तर अमेरिकन वित्तीय व्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ देखील कमकुवत होतील.प्रशासनाच्या बाजूने, ट्रम्पचे लेफ्टनंट मोठ्या प्रमाणात म्हणतात की ते फेडच्या स्वातंत्र्या वर विश्वास ठेवतात परंतु मध्यवर्ती बँकेला अशांतपणे चालणारी संस्था मानतात ज्यावर राज्य करण्याची आवश्यकता आहे असे तज्ज्ञ सांगतात.
आज युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.००%), एस अँड पी ५०० (०.६४%), नासडाक (१.१५%) या तिन्ही बाजारात घसरण झाली असून युरोपियन बाजारातील सुरुवातीच्या कलात एफटीएसई (०.१६%),सीएसी (०.१२%), डीएएक्स (०.३६%) बाजारात वाढ झाली आहे. प्रामुख्याने आगामी काळातील आकडेवारीमुळे युरोपियन बाजारात सकारात्मकता कायम होती. अखेरच्या सत्रात आशिया शेअर बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आशियाई बाजारातील भारत व चीन यांच्यातील संबंधांवर आव श्यक ती अस्पष्टता, दुसरीकडे चीनमध्ये वाढलेली उत्पादन आकडेवारी यामुळे बाजार विभागला गेल्याने आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. संध्याकाळपर्यंत गिफ्ट निफ्टी (०.७१%) सह स्ट्रेट टाईम्स (०.१५%), हेंगसेंग (२.१५%), सेट कंपोझिट (०. ६३%) शांघाई कंपोझिट (०.४५%) बाजारात वाढ झाली असून निकेयी २२५ (१.३६%), तैवान वेटेड (०.६७%), जकार्ता कंपोझिट (१.२२%), कोसपी (१.३७%) निर्देशांकात घसरण झाली आहे.
आज दिवसभरात सोन्याचा निर्देशांकात नव्या जागतिक उच्चांकावर वाढ गेल्याने बाजारात गुंतवणूकदारांचा सोने खरेदीकडे कल वाढल्याचे स्पष्ट झाले. प्रामुख्याने चीन व भारत भेटीसह युएस फेडरल रिझर्व्हकडून सप्टेंबर महिन्यात अपेक्षित असलेले वक्तव्याची वाट गुंतवणूकदार पाहत आहेत. अशा परिस्थितीत सोन्याच्या मागणीत अस्थिरतेसह मोठी वाढ झाली आहे. संध्याकाळपर्यंत सोन्याचा जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.७९% वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही बदललेल्या भूराजकीय समीकरणा मुळे व उत्पादनापेक्षा मागणीत वाढ झाल्याने कच्चे तेल (Crude Oil) महागले आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या जागतिक WTI Futures निर्देशांकात ०.९२% वाढ झाली असून Brent Future निर्देशांकात ०.७८% वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ची १७ पैशांहून अधिक पातळीवर दिवसात घसरण झाल्याने डॉलर निर्देशांकात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले ज्याचा फटका भारतातील सोन्यातील किंमतीत बसला होता.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ओला इलेक्ट्रिक (१५.०६%), कायनीस टेक (७.७९%), आदित्य बिर्ला फॅशन (७.७६%), जीएमडीसी (६.८२%), ई क्लर्क सर्विसेस (६.५३%), सीपीसीएल (६.४५%), ट्युब इन्व्हेसमेंट (६.०५%), एमसीएक्स (५.४५%), डिक्स न टेक्नॉलॉजी (५.३५%), स्विगी (४.५८%), डेटा पँटर्न (४.५४%), जे एम फायनांशियल (४.२८%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (४.१०%), हिंदुस्थान झिंक (३.९७%), एचबीएल इंजिनिअरिंग (३.९६%), सीडीएसएल (३.६९%), एम अँड एम (३.६२%), टाटा मोटर्स (३.१ ६%), झेन टेक्नॉलॉजी (३.११%), इन्फोसिस (२.११%) या समभागात झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण वारी एनर्जीज (५.१३%), गॉडफ्रे फिलिप्स (३.९३%) पिरामल एंटरप्राईजेस (३.०१%), युनायटेड ब्रेवरीज (३.०१%), करूर वैश्य बँक (२.३१%), सन फार्मा (१.९६%), मेट्रोपॉलिस हेल्थ (१.८२%), झी एंटरटेनमेंट (१.७९%), बजाज होल्डिंग्स (१.७७%), सिग्नेचर ग्लोबल (१.५२%), अजंता फार्मा (१.०३%), आयटीसी (०.९५%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.१६%), एचडीएफसी बँक (०.०८%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,'आजचा बाजार एका वेगळ्याच मूडमध्ये होता.जीडीपीचे प्राप्त आकडे,पंतप्रधानांचे जपान,व चायना दौरे या सगळ्यातच टॅरिफ संकटाची भीती नक्कीच कमी होताना पहायला मिळाली.याचा अर्थ विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री थांबेल असे नाही.पण भारतातील उद्योग जगतातील मंडळी हळूहळू आश्वस्त होताना बाजाराला वाटायला लागलं आहे हे निश्चित.नवीन देश हे पुढे येऊन भारताबरोबर व्यापार वाढवणार आहेत असे चित्र आजतरी आपला बाजार मजबूत ठेवत आहेत.तसेच जीएसटी बैठक व व्याज दरकपात ही पाॅझिटिव्ह अपेक्षित आहे. कापुस आयात शुल्क माफी डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते आहे की अमेरिकन टॅरि फचा परिणाम फारसा होणार नाही .त्याचा परिणाम आज सर्वच क्षेत्रात पहायला मिळाला.महिन्द्रा,टाटा मोटर,बजाज फायनानस, ट्रेंट, एसबीआयमध्ये चांगली वाढ पहायला मिळाली आहे.'
त्यामुळे आजच्या बाजारात वाढ ही आशादायक असली तरी बाजारातील उद्याची आव्हानेही कायम आहेत. विशेषतः सातत्याने घसरणाऱ्या बँक निफ्टीसह अस्थिरता निर्देशांकांचे आव्हान उद्या कायम असेल. टॅरिफला युएस न्यायालयाने असंविधानिक ठरवल्यानंत र ही त्याची अंमलबजावणी सुरू ठेवण्यास परवानगी दिली असल्याने भारतीय निर्यातदार, गुंतवणूकदार, तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकते त्यामुळे आजच्या पंतप्रधान मोदी यांच्या चीन दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आगामी दिवसात म्यानमारमध्येही निवडणूक असल्याने जगभरातील अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम बाजारात अपेक्षित आहे. निफ्टी क्षेत्रीय विशेष समभागासह जीएसटी कपातीच्या घोषणेनंतर फायदेशीर शेअर खरेदी केल्यास बाजारातील नुकसान नियंत्रित करण्यास गुंतवणूकदारांना मदत होईल.