
मोहित सोमण: ओला इलेक्ट्रिक लिमिटेड (Ola Electric Limited) कंपनीच्या शेअरने सकाळच्या सत्रात मोठी उसळी मारल्याने शेअर नव्या उच्चांकावर गेला आहे. सकाळी १२.३० वाजता ओला इलेक्ट्रिक शेअर थेट १२.०३% उसळल्याने कंपनीचा शेअर ६०. ५५ रूपयांवर गेला आहे. सकाळच्या सत्रातील सुरुवातीलाही ओला इलेक्ट्रिक शेअर १०% पेक्षा अधिक पातळीवर उसळला होता. प्रामुख्याने ही वाढ कंपनीला पीएलआय (Production Linked Incentives PLI) क्लिअरन्स मिळाल्याने शेअरमार्केटमधील सेटिं मेटमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे कंपनीच्या शेअरला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला.
केंद्र सरकारने ओला इलेक्ट्रिकला पीएलआय प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे सरकारने दिलेले उत्पादनाचे लक्ष पूर्ण केल्यास कंपनीला भत्त्याचा (Incentives) परतावा मिळणार आहे. जनरेशन २ व जनरेशन ३ स्कूटरसाठी कंपनीला हे प्रमाणपत्र मिळाले आहे. या कंपनीसह इतर काही कंपन्यांनाही सरकारने पीएलआय प्रमाणपत्र दिले होते ज्यामध्ये टाटा मोटर्स, एम अँड एम कंपन्यांचाही समावेश आहे. याशिवाय सरकारने जीएसटीत मोठी कपात करण्याचे ठरवले असल्याने ऑटोमोबाईल क्षेत्राला याचा मोठा फायदा अपे क्षित आहे. ठराविक दुचाकी, चारचाकी यांच्यावर केवळ ५% जीएसटी लागू शकतो त्यामुळे गुंतवणूकदारांनी या सेक्टरलाही आज समाधानकारक प्रतिसाद दिला आहे.ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या जनरेशन २ आणि जनरेशन ३ स्कूटर्ससाठी उत्पादन लिंक्ड इन्सें टि व्ह (पीएलआय) योजनेअंतर्गत प्रमाणपत्र दिल्यामुळे गुंतवणूकदारांकडून कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी मागणी निर्माण झाली.
हे क्लिअरन्स प्रमाणपत्र अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने दिले आहे. या प्रमाणपत्रात ओलाच्या एस१ जनरल ३ लाइन-अपमधील सात मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीला अपेक्षा आहे की हे प्रमाणपत्र आर्थिक व र्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीपासून त्यांची नफा वाढवण्यास मदत करेल. याखेरीज ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनीही भारतातील दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेतील २५-३०% हिस्सा (Market Share) काबीज करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे सांगितले होते .येत्या काळात ओला इलेक्ट्रिकचे शेअर आणखी मोठी रॅली करतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कारण गेल्या आठवड्यात ओला इलेक्ट्रिक शेअर १४% वाढला असून कंपनीला आगामी काळात उत्पादनातील मार्जिनमध्ये वाढ होण्याची शक्य ता आहे.