शांघाय: रविवारपासून चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SEO) शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होण्यासाठी चीनला गेले आहेत, यादरम्यान त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय चर्चा केली. आज, सोमवारी, एससीओ नेत्यांची बैठक होणार आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य देश समान हितसंबंध आणि आव्हानांवर चर्चा करतील. हे सत्र जागतिक स्तरावर खूप महत्वाचे मानले जात आहे.
भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता एससीओ नेत्यांची बैठक होणार आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य देशांचे नेते समान हितसंबंध आणि आव्हानांवर चर्चा करतील. या बैठकीबाबत जागतिक पातळीवर मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
तत्पूर्वी रविवारी, एससीओ शिखर परिषदेत सदस्य देशांच्या नेत्यांचे औपचारिक ग्रुप फोटो सत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत पुढच्या रांगेत दिसले. शिखर परिषदेपूर्वी, जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी पेंग लियुआन यांनी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी एका भव्य मेजवानीचे आयोजन केले होते. या दरम्यान हे त्रिकुट एकमेकांना भेटून, हसतखेळत हस्तांदोलन करताना दिसले.