
प्रतिनिधी:आज सकाळी दक्षिण मुंबईत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती. सकाळी फोर्टमधील दलाल स्ट्रीट येथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये (Bombay Stock Exchange BSE) येथे काही मराठा आंदोलक बांधवांनी शिरण्याचा प्रयत्न केला. सिक्युरि टीकडून अडवण्यात आले असता 'आम्हीही शेअर होल्डर आहोत', आम्हालाही शेअर बाजार पाहण्याचा हक्क आहे ' असे उत्तर काही आंदोलकांनी दिले आहे. सकाळपासूनच सीएसएमटी, मंत्रालय, फोर्ट, नरिमन पॉइंट, व दक्षिण मुंबईतील अनेक भागात मराठा आंदोलकांची गर्दी जमली होती. त्यामुळे मुंबई पोलिस व ट्रॅफिक पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती.याच दरम्यान काही आंदोलक शेअर बाजारात घुसले. त्यावेळी ' आमच्या आंदोलनाचा शेअर बाजारात परिणाम होऊ शकतो म्हणून आम्ही मार्केटची परिस्थिती बघण्यासाठी आलो आहोत असे उत्तर त्यांनी आंदोलकांना दिले होते. त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनातील बांधवांनी तिथे जोरदार घोषणाबाजी केली आहे. दरम्यान या प्रकारानंतर पोलिसांनी या परिसरात अतिरि क्त सुरक्षा वाढवली असून आता परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच पोलिसांनी रोखण्यापूर्वी 'एक मराठा लाख मराठा' 'आरक्षण आमचा हक्क आहे ' अशा प्रकारच्या घोषणाही आंदोलकांनी दिल्या. त्यामुळे काही वेळासाठी परिस्थिती तणावपूर्ण झाली असली तरी आता परिस्थिती पूर्ववत आहे आणि परिसरात शांतता आहे. अ से असले तरी दिवसभरात दक्षिण मुंबईत गाड्यांच्या रांगा लागल्या असल्याने या रहदारीचा फटका आपले कार्यालय गाठणाऱ्या चाकरमान्यांना मात्र बसला होता.यापूर्वीही काही व्यापारी वर्गाने आंदोलनावरून चिंता व्यक्त केली होती. दक्षिण मुंबईतील व्यवसायांना दीर्घकालीन नुकसानापासून वाचवण्यासाठी सरकार किंवा उच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन (FRTWA) चे अध्यक्ष वीरेन शाह म्हणाले की, आझाद मैदानावरील प्रचंड गर्दीमुळे दक्षि ण मुंबई पूर्णपणे गोंधळात पडली आहे आणि दुकाने आणि बाजारपेठांमध्ये आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या विक्रीवर परिणाम झाला आहे.'
'ही गतिरोधकता पुढे ढकलता येणार नाही. सामान्य स्थिती पुनर्संचयित करण्यासाठी सरकारकडून तातडीने चर्चा किंवा उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे. अन्यथा, दक्षिण मुंबईच्या व्यवसायाचे आणि उपजीविकेचे दीर्घकालीन नुकसान विनाशका री असेल,' असे ते पुढे म्हणाले होते. दुकाने आणि बाजारपेठांमध्ये आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या विक्री नगण्य पातळीवर घसरल्या आहेत ज्यामुळे व्यापारी आणि व्यवसाय मालक असहाय्य झाले आहेत असे वृत्त यापूर्वी प्रसारमाध्यमांनी दिले होते. व्यावसायिक बै ठका पुढे ढकलल्या जात आहेत, कार्यालये विस्कळीत झाली आहेत आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे, असा दावा शाह यांनी केला होता.मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारपासून दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोष णाला बसले आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी श्रेणीत अंतर्गत आरक्षण मिळेपर्यंत ते मुंबई सोडणार नाहीत असे जरांगेंनी यापूर्वी स्पष्ट केले होते.