
प्रतिनिधी:उत्पादन निर्मितीत १७ वर्षातील सर्वाधिक वाढ झाल्याचे एचएसबीसी इंडिया मॅनुफॅकचरिंग परचेसिंग मॅनेजर इंडेक्स (HSBC India Manufacturing PMI) आपल्या नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. आकडेवारीनुसार ऑगस्ट महि न्यात पीएमआय निर्देशांकात १७ वर्षातील उच्चांकी वाढ झाली. इयर ऑन इयर बेसिसवर मागील महिन्यात उत्पादन आऊटपुट (Manufacturing Output) मध्ये ७.७% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत ४.८% वाढ झाली होती. याआधी नुक त्याच सरकारी आकडेवारीनुसार,पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) अपेक्षेपेक्षाही अधिक वाढ झाली होती. ६.५% अंदाज वर्तवला जात असताना ही वाढ ७.८% झाली होती जी प्रामुख्याने मागणी व उत्पादनातील वाढीमुळे झाली.याच धर्तीवर एचएस बीसी पीएमआय निर्देशांकात अपेक्षेपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. वाढलेली प्रचंड मागणी, वाढलेले उत्पादन या कारणामुळे पुन्हा एकदा आऊटपूटमध्ये वाढ होऊन अंतिमतः पीएमआय निर्देशांकात वाढ झाली आहे. तज्ञांनी मात्र आगामी काळात अतिरिक्त टॅरि फ, तसेच भूराजकीय कारणांमुळे आगामी उत्पादन निर्देशांकात मर्यादा येऊ शकतात असे म्हटले. भारताच्या एकूण जीडीपीतील १७% वाटा हा उत्पादन क्षेत्राचा (Manufacturing Sector) आहे. नेमक्या आकडेवारीप्रमाणे, एस अँड पी ग्लोबल पुरस्कृत एचएस बीसी पीएमआय निर्देशांकात ऑगस्ट महिन्यात ५९.३ पातळीवर वाढ झाली आहे. फेब्रुवारी २००८ नंतरची ही सर्वाधिक वाढ झाली. तेव्हा फेब्रुवारी २००८ मध्ये ५९.१ पातळीवर उत्पादनाचे आऊटपूट गेले होते.
'उत्पादनात जलद वाढ झाल्यामुळे ऑगस्टमध्ये भारताचा उत्पादन पीएमआय आणखी एक नवीन उच्चांक गाठला. भारतीय वस्तूंवरील अमेरिकेतील शुल्क ५०% पर्यंत वाढल्याने नवीन निर्यात ऑर्डर वाढीमध्ये थोडीशी घट झाली असावी, कारण अमेरिकन खरेदी दार टॅरिफ अनिश्चिततेच्या काळात ऑर्डर देण्यापासून परावृत्त होतात' असे आकडेवारीवर व्यक्त होताना एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले आहेत.'दुसरीकडे, एकूण ऑर्डर वाढ खूपच चांगली राहिली ज्यामुळे देशांतर्गत ऑ र्डर मज बूत राहिल्याचे दिसून येते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर टॅरिफ-संबंधित ताण कमी होण्यास मदत झाली' असेही ते पुढे म्हणाले आहेत. २०२० च्या अखेरीपासून उत्पादन उप-निर्देशांक (Production Sub Index) सर्वात मजबूत वेगाने वाढला असून कंपन्यांनी पुरवठा आणि मागणी यांच्यातील चांगल्या संरेखनाचे (Structuring) कारण तज्ञांनी दिले आहे.ऑगस्टमध्ये नवीन ऑर्डरमध्ये वाढ होत राहिली, जुलैमध्ये दिसणारी वेगवान गती कायम राहिली जी पाच वर्षांतील सर्वात वेगवान होती असे अहवालात म्हटले आहे. कं पन्यांनी मागणीची ताकद आणि यशस्वी जाहिरात मोहिमांना (Advertising Campaign) सतत वाढण्याचे श्रेय दिले.२०२० च्या अखेरीपासून उत्पादन उप-निर्देशांक सर्वाधिक वेगाने वाढला आहे.
ऑगस्टमध्ये नवीन निर्यात ऑर्डरमध्ये मंद गतीने वाढ झाली. जी पाच महिन्यांतील सर्वात कमकुवत विस्तारीकरण असले तरी जागतिक मानकांचा विचार केल्यास अजूनही मजबूत राहिली आहे. उत्पादकांनी आशिया, युरोप, मध्य पूर्व आणि युनायटेड स्टेट्समधील ग्राहकांकडून नवीन काम मिळवल्याचे नोंदवले अहवालात नोंदविण्यात आले आहे.माहितीनुसार, कंपन्यांनी सलग १८ व्या महिन्यात त्यांचे कर्मचारी वाढवले, जरी नोव्हेंबर २०२४ नंतर रोजगार निर्मितीचा वेग सर्वात कमकुवत झाला. नियंत्रण असूनही, दीर्घकालीन ट्रेंडच्या तुलनेत भरती मजबूत राहिली. इनपुट आणि आउटपुट दोन्ही किमती तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने महागाईचा दबाव वाढला. इनपुट खर्चात किंचित वाढ होत राहिली, जरी उत्पादकांनी बेअरिंग्ज, लेदर, खनिजे, स्टील आणि इलेक्ट्रॉनिक घटकां च्या किमती जास्त नोंदवल्या.याउलट, कंपन्यांनी मागणीच्या मजबूत परिस्थितीचा फायदा घेत ग्राहकांना खर्च सोपवला असल्याने विक्रीच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्या.कंपन्यांनी इन्व्हेंटरी पातळी पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना, १६ महिन्यांत स र्वात जलद गतीने त्यांच्या खरेदी क्रियाकलापांना वाढ दिली, जी दीर्घकालीन सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.ऑगस्टमध्ये उत्पादकांमधील व्यवसाय आत्मविश्वास सुधारला, जुलैच्या तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवरून सावरला, अमेरिकेच्या टॅरिफमुळे वाढी च्या दृष्टिकोनावरही मागणीने परिणाम झाला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.