"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या थप्पड कांडचा व्हिडिओ शेअर केला. आयपीएल २००८ मधील १० व्या सामन्याच्या शेवटी हरभजन सिंगने श्रीशांतच्या श्रीमुखात मारली होती, ती घटना त्याकाळी चांगलीच गाजली होती. मात्र त्याचा व्हिडिओ काही लिक झाला नव्हता, परंतु तब्बल १६ वर्षानंतर हा व्हिडिओ लोकांसमोर आला आहे. ज्यावर फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी आयुक्त ललित मोदींवर निशाणा साधला आहे. ललित मोदींनी अलीकडेच आयपीएल २००८ च्या 'थप्पड कांड'चा व्हिडिओ सार्वजनिक केला. हरभजनने श्रीशांतला श्रीमुखात लगावण्याची हीच ती घटना होती. मोहालीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्यानंतर ही घटना घडली. त्यावेळी हरभजन मुंबई इंडियन्सचा भाग होता आणि श्रीशांत किंग्ज इलेव्हन पंजाबमधून खेळत होता.



'त्या' व्हिडिओ लिकमुळे हरभजन ललित मोदींवर संतापला


थप्पड कांडच्या या वादामुळे क्रिकेट जगतात त्यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती. तसेच हे कृत्य केल्याबद्दल हरभजन सिंगवर संपूर्ण हंगामात बंदी घालण्यात आली होती. याच्या बातम्या सर्वत्र आल्या होत्या, मात्र प्रसारकांनी ही घटना लाईव्ह टेलिकास्टमध्ये दाखवली नव्हती. ही घटना जेव्हा घडली तेव्हा जाहिरातींचा ब्रेक सुरू होता, आणि जेव्हा लाईव्ह कव्हरेज पुन्हा सुरू झाले तेव्हा श्रीशांत रडताना दिसला होता. मात्र आता इतक्या वर्षांनंतर, जेव्हा ललित मोदी यांनी कधीच पाहिला न गेलेला 'तो' व्हिडिओ सार्वजनिक केला तेव्हा हरभजन संतापला.


हरभजन सिंगने इन्स्टंट बॉलीवूडशी बोलताना म्हटले की, 'ज्या पद्धतीने तो व्हिडिओ लीक झाला तो पूर्णपणे चुकीचा आहे. हे घडायला नको होते. यामागे त्याचा (ललित मोदी) काही स्वार्थी हेतू असावा. १८ वर्षांपूर्वी जे घडले ते लोक विसरले होते. आता पुन्हा त्याची आठवण करून दिली जात आहे.'


हरभजन सिंगने कबूल केले की ही त्याची चूक होती आणि त्याला त्या गोष्टीची आजही लाज वाटते. तो म्हणाला, 'जे घडले त्याचा मला पश्चात्ताप आहे. खेळात अशा परिस्थिती अनेक वेळा उद्भवतात. माणसे चुका करतात, मीही केल्या. मी अनेक वेळा म्हटले आहे की ही माझी चूक होती आणि मला त्याचा पश्चात्ताप आहे. मी पुन्हा काही चूक केल्यास मला क्षमा करावी अशी मी भगवान गणेशाला प्रार्थना केली आहे.'



हरभजन सिंग आणि श्रीसंतचे नाते


हरभजन सिंग आणि एस. श्रीसंत दोघांनीही ही घटना आता मागे सोडून दिली आहे. आता हे दोघेही चांगले मित्र असून, त्या घटनेनंतरही ही दोघे भारतीय संघात एकत्र खेळताना दिसून आली होती. दोघेही २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. निवृत्तीनंतरही दोघांनी मैत्रीपूर्ण संबंध कायम राखले आहेत आणि लेजेंड्स लीगमध्ये देखील ही दोघं एकत्र खेळली आहेत. श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी हिनेही या संपूर्ण प्रकरणाबाबत ललित मोदींवर टीका केली आणि म्हटले की, स्वस्त प्रसिद्धीसाठी अशाप्रकारे जुना व्हिडिओ सार्वजनिक करून ललित मोदी यांनी त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या