Sunday, August 31, 2025

मराठा आरक्षणसाठी युवकाची आत्महत्या

मराठा आरक्षणसाठी युवकाची आत्महत्या
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शेकडो बांधव मैदानावर हजर आहेत. शिवाय राज्यभरातूनही अनेकजण मुंबईत दाखल होत आहेत. या दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणी करत थेट गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणानंतरही, मराठा आरक्षणाबाबत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने आलेल्या नैराश्यातून नितीन माणिकराव चव्हाण या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सुगाव गावावर शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment