
मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे समर्थक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केल्याचे जाहीर केले आहे. आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या जरांगेंनी मागण्या पूर्ण होत नसतील तर चौथ्या दिवसापासून पाणीही घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.
सरकार ऐकत नसेल, मागण्या मान्य होणार नसतील तर उपोषण आणखी कडक करणार. आता पाणीही पिणार नाही असे जरांगेंनी जाहीर केले. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचे जरांगेंनी जाहीर केले.
कुणी रेनकोट, छत्र्या वाटत असतील तर एक रुपया देऊ नका. काही लोकांनी धंदा सुरू केला आहे. समाजाच्या नावाने कमवत आहेत. रेनकोट वाटपाच्या नावाखाली पैसे गोळे करू नका. हे मी शेवटचं सांगतोय. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कुणालाही पैसे द्यायचे नाही. फक्त गरीबाची सेवा करा. काही लोक समाजाला मदत करायची सोडून पैसे छापायला बघत आहे; असेही जरांगे म्हणाले.
मंत्री फक्त बैठका घेतात, आरक्षण देत नाहीत, असा आरोप करत जरांगेंनी मंत्र्यांवर टीका केली. मंत्री भंगार आहे, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला.