मुंबई: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'चाणक्य नीती'मध्ये केवळ राजकारण आणि समाजकारणच नव्हे, तर पैसा कमावण्याचे आणि तो टिकवून ठेवण्याचे अनेक महत्त्वपूर्ण धडे दिले आहेत. त्यांच्या मते, काही चांगल्या सवयी अंगीकारल्यास व्यक्ती नक्कीच श्रीमंत होऊ शकते आणि आर्थिक अडचणींपासून दूर राहू शकते. चला तर मग, जाणून घेऊया चाणक्य यांनी सांगितलेल्या त्या ५ सवयी.
१. पैशांची बचत:
चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती भविष्य लक्षात घेऊन पैशांची बचत करतो, तो कधीही आर्थिक संकटात सापडत नाही. सध्याच्या उत्पन्नातील काही भाग भविष्यासाठी वाचवून ठेवल्यास आपत्कालीन परिस्थितीत मोठी मदत मिळते.
२. चांगल्या कामात गुंतवणूक:
केवळ पैसा वाचवून ठेवणे पुरेसे नाही. चाणक्य सांगतात की, पैशाचा उपयोग चांगल्या कामात किंवा गुंतवणुकीत केला पाहिजे. उदा. योग्य व्यवसाय, शिक्षण किंवा आरोग्य. यामुळे केवळ व्यक्तीच नाही, तर समाजही पुढे जातो आणि संपत्ती वाढते.
३. कठोर परिश्रम:
आळशीपणा हे दारिद्र्याचे मूळ आहे. चाणक्य यांच्या नीतीनुसार, जी व्यक्ती कठोर परिश्रम करते आणि आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करते, तिच्याकडे संपत्ती आपोआप आकर्षित होते. कठोर परिश्रमामुळे व्यक्ती आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकते.
४. खर्चावर नियंत्रण:
श्रीमंत होण्यासाठी केवळ उत्पन्न वाढवणे महत्त्वाचे नाही, तर खर्चावर नियंत्रण ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. चाणक्य म्हणतात, जी व्यक्ती आपल्या उत्पन्नानुसार खर्च करते आणि अनावश्यक खर्च टाळते, ती नेहमी समृद्ध राहते.
५. धार्मिक आणि नैतिक आचरण:
आचार्य चाणक्य यांच्या मते, नैतिक मूल्यांचे पालन करणारी आणि धार्मिक विचारांची व्यक्ती नेहमी यश आणि सन्मान मिळवते. अशी व्यक्ती योग्य मार्गाने पैसा कमावते आणि समाजात तिचे स्थान उंचावते. चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती कधीही टिकत नाही, असे ते ठामपणे सांगतात.