
मुंबई (प्रतिनिधी) : गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी म.रे. काडून छत्रपती शिवानी महारान टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई ते कल्याण ठाणे व परतीसाठी विशेष मध्यरात्री उपनगरी सेवा घालवण्यात येणार आहेत. या गाड्या सीएसएमटी ते कल्याण दरम्यान ४,५ सप्टेंबरच्या मध्यरात्री तसेच ६ आणि ७ च्या मध्यरात्री धावतील, हार्बर मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या ६ आणि ७ सप्टेंबरच्या रात्री सीएसएमटर्व ते पनवेल आणि परतीच्या प्रवासासाठी धावतील. ही सेवा सीएसएमटी ते कल्याण ठाणे/पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार थांबतील.
डाउन मेन मार्गावर ४,५, ६,७ व ९ सप्टेंबरच्या रोजी सीएसएमटी- कल्याण विशेष गाडी सीएसएमटी येथून १.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३.१० वाजता पोहोचेल. सीएसएमटी-ठाणे विशेष सेवा सीएसएमटी येथून २.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल. सीएसएमटी कल्याण विशेष गाडी सीएसएमटी येथून ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ४.५५ वाजता पोहोचेल, अप मेन मार्गावर ४,५,६,७ व ९ सप्टेंबरला कल्याण-सीएसएमटी विशेष गाडी कल्याण येथून ५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे ९:३० वाजता पोहोचेल. ठाणे-सीएसएमटी विशेष गाड़ी ठाणे येथून १ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे २ वाजता पोहोचेल, ठाणे-सीएसएमटी विशेष गाडी विशेष गाडी ठाणे येथून २ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे ३ वाजता पोहोचेल.
डाउन हार्बर मार्गावर ६ ७९ सप्टेंबरला ऑल-पनवेल विशेष गाडी सीएसएमटी येथून १.३० वाजता सुटेल व पनवेल येथे २.५० वाजता पोहोचेल. सीएसएमटी पनवेल विशेष गाडी सीएसएमटी येथून २.४५ वाजता सुटेल व पनवेल येथे ४.०५ वाजता पोहोचेल. अप हार्बर मार्गावर ६,७ व ९ सप्टेंबरला पनवेल-सीएसएमटी विशेष गाडी पनवेल येथून १ वाजता सुटेल आणि सीएसएमटी मुंबई येथे २.२० वाजता पोहोचेल. पनवेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी पनवेल येथून १.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवानी महाराज टर्मिनस येथे ३.०५ वाजता पोहोचेल. प्रवाशांनी कृपया माची नोंद घ्यावी व या गणेशोत्सव विशेष उपनगरी माड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्ये रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.