
जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै
देवावर प्रेम करायला शिकले पाहिजे. देवावर प्रेम तेव्हाच करता येईल जेव्हा जेव्हा त्यांच्याबद्दलचे खरे योग्य ज्ञान मिळेल. परमेश्वराबद्दल खरे ज्ञान मिळाल्याशिवाय त्याच्यावर खरे प्रेम करताच येणार नाही, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. योग्य ज्ञानाशिवाय परमेश्वरावर प्रेम करण्याचा जो प्रयत्न केला जातो, त्याला भोळा भाव असे म्हणतात. मात्र जीवनविद्येला हे मान्य नाही. “भोळा भाव गोता खाय” अशी एक म्हण आहे. असा भोळा भाव बाळगणारा कधी ना कधी गोत्यात येतोच व असा भोळा भाव देवालाही आवडत नाही. मात्र भोळा या शब्दाचा अजून एक दुसरा अर्थ आहे. भोळा म्हणजे शुद्ध. भोळा शंकर म्हणजे शंकराचे स्वरूप शुद्ध आहे. भोळा म्हणजे शुद्ध हा त्याचा खरा अर्थ आहे. पण आज लोक भोळा म्हणजे बावळटपणा असा अर्थ घेतात. बावळटपणे कुणी काही करत असेल तर लोक त्याला तो काय भक्त आहे असे म्हणतात. काही लोक तीर्थयात्रेला लोटांगण घालत जातात. ह्याला काय अर्थ आहे? किंबहुना ह्यांत काय ज्ञान आहे? लोटांगण घालत जाणे म्हणजे भक्ती ही कल्पना आहे. कल्पनेच्या पोटी कामे होत नाहीत असे नाही. कल्पना ही एक प्रचंड शक्ती आहे म्हणून कल्पनेच्या पोटी काही कामे होतात पण जी कामे होतात ती फार धोक