
तिआनजिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची शांघाय कॉऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने चीनमधील तिआनजिन शहरात भेट झाली. यावेळी मोदी आणि जिनपिंग यांच्यात एक द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेद्वारे भारत आणि चीन यांच्यातील परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी तसेच विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही देशांनी करायच्या कृतीबाबतही सहमती झाली.
मोदी - जिनपिंग बैठकीतील १० महत्त्वाचे मुद्दे
१ द्विपक्षीय संबंधांमध्ये सातत्याने प्रगती होत आहे. ही आनंदाची बाब आहे. प्रगतीच्या मार्गावर भारत आणि चीन हे भागीदार आहेत. प्रतिस्पर्धी नाहीत. यामुळे मतभेद झाल्यास चर्चेतून मार्ग काढावा यावर सहमती झाली
२ भारतातून चीनसाठी आणि चीनमधून भारतासाठी थेट विमान प्रवासाची व्यवस्था
३ भारत आणि चीन सुरक्षा तपासणी करुन एकमेकांच्या नागरिकांना पर्यटनासाठी व्हिसा देतील. तिबेटमधील कैलास पर्वत आणि मानसरोवर सरोवराची यात्रा पुन्हा सुरू
४ द्विपक्षीय व्यापार वाढीसाठी दोन्ही देश काम करतील. दहशतवादासारख्या सर्व गंभीर जागतिक मुद्यांवर समान धोरण ठेवण्यासाठी चर्चा करतील
५ सीमेवर तणाव टाळण्यासाठी चर्चा सुरू राहील
६ दोन्ही देश आपापल्या नागरिकांच्या कल्याणासाठी काम करतील
७ द्विपक्षीय संबंध धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून हाताळणार
८ आर्थिक मुद्यांवर भारत आणि चीन एकमेकांना सहकार्य करतील आणि व्यापार वृद्धीसाठी काम करतील, सीमामार्गे व्यापार पुन्हा सुरू होईल,
९ दोन्ही देश एकमेकांवरील व्यापार निर्बंध दूर करतील
१० परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवर चर्चा सुरू राहील