
मोतीराम मारुती घुगे (वय ७० वर्ष) असे संबंधीत शेतकऱ्याचे नाव आहे. मोतीराम घुगे यांच्याकडे फक्त दीड एकर जमीन आहे. या जमिनीवर त्यांचे संपूर्ण कुटुंब जगते. परंतु पाऊस आणि पुरामुळे त्यांचे शेत पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि उभे पीक नष्ट झाले. नुकसानीचे हे दृश्य पाहून त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते जवळून वाहणाऱ्या नदीच्या दिशेने धावले, आणि नदीत उडी मारून आयुष्य संपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र सुदैवाने गावातील काही तरुणांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. या घटनेमुळे मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती समोर आणली आहे. सततचा पाऊस आणि पुरामुळे पिकांचे झालेल्या अतोनात नुकसानीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिकच गडद होत चालले आहे. मोतीराम घुगे यांनी सरकारकडे त्यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा करून योग्य आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे. लातूरसह आसपासच्या अनेक भागातही अशीच परिस्थिती आहे, जिथे शेतकरी त्यांच्या कष्टाचे पैसे पाण्यात वाहून गेल्याचे पाहून हवालदिल झाले आहेत.Sad very sad .. Maharashtra’s Latur district in which a farmer insisting to commit suicide due to the destruction of crops in flood. In the viral video, the farmer is spoiling in a field full of water. He is saying, “Everything is washed away, let me die, what should I do by… pic.twitter.com/qgK6OYWyQs
— Waahiid Ali Khan (@waahiidalikhan) August 30, 2025