
प्रिया मराठेने चार दिवस सासूचे, पवित्र रिश्ता, तू तिथे मी, स्वराज्यरक्षक संभाजी, या सुखांनो या, या मालिकांमध्ये अभिनय केला होता. प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून कौतुकाची पावती मिळाली होती. यामुळे प्रियाच्या अकाली निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे.
प्रिया आजारी आहे, तिला कर्करोग झाला आहे याची माहिती अनेकांना नव्हती. यामुळे तिच्या निधनाची बातमी अनेकांसाठी मोठा धक्का ठरली आहे.
निवडक मराठी आणि हिंदी टीव्ही मालिका तसेच मोजक्या चित्रपटांमधून प्रियाने अभिनय केला होता. पवित्र रिश्ता या हिंदी टीव्ही मालिकेमुळे प्रिया घराघरात पोहोचली होती. या मालिकेत प्रियाने अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारली होती. प्रियाने २०१२ मध्ये शंतनु मोघे याच्यासोबत लग्न केले. शंतनुने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपं म्हणून प्रिया आणि शंतनु यांच्याकडे चाहते बघत होते.