विचारांनी कृती करा

आत्मज्ञान - प्राची परचुरे वैद्य


बोलणं आणि वागणं यामध्ये अंतर नसलं पाहिजे आपण जे बोलतो तसंच आपण वागलो तर आपण केलेल्या परिवर्तनाचा आरंभ लोक आपोआप स्वीकारतात. वागणं आणि बोलणं यामध्ये अंतर निर्माण झालं तर लोक आपल्याला काही काळ विसरतील पण दीर्घकाळ आपल्या सोबत परिवर्तनाचे साक्षीदार म्हणून राहणार नाहीत. म्हणून परिवर्तन हे कृतिशील असलं पाहिजे. परिवर्तन क्रांती झाली पाहिजे असं अनेकांचं मत असतं पण हे परिवर्तन स्वतःपासून स्वतःमध्ये कृतिशील बदल घडवून करायला फार कोणीही धजावत नाही. प्रत्येकाचा समज हाच आहे, की मी इतरांना उपदेश करण्यासाठी योग्य आहे. मला अनुकरण करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मग सगळी फसगत इथंच होते. खरी आवश्यकता असते ती स्वतःमध्ये बदल घडवून आणायची. कृतिशीलता जाणवली तर इतर ते आपोआप अनुकरण करतात. म्हणून असं आचरण करण्याची आवश्यकता आहे पण दुर्दैवाने असं होत नाही. स्वतःला वजा करून इतरांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी आपण उतावीळ असतो. इतरांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे यासाठी प्रयत्नशील असणारी संख्या प्रचंड मोठी असली तरी देखील प्रत्यक्षात कृतिशील कार्यरत संख्या ही मोजकीच असल्याने सगळं परिवर्तन हे फक्त हवाबाजीत अडकून पडत आहे. आपण आपलं स्वतःच मूल्यमापन करणं गरजेचं आहे पण प्रत्येकजण स्वतःचं सोडून इतरांचं मूल्यमापन करत आहे. त्यामुळे आपण आपलं स्वतःचं मूल्यमापन काय आहे हेच सोयीस्कर विसरतो. म्हणून ते परिवर्तन वरवरचं ठरतं. जो उपदेश आपण लोकांना करतो. त्याचं आचरण आपण स्वतः किती टक्के करतो यावर त्या विचारांचा प्रभावीपणा अवलंबून असतो. म्हणून मोजकं, थोडं मर्यादित पण कृतिशील कार्य हे कधीही उत्तमच, समाज सुधारणेच प्रतीक ठरतं. तळमळ असणं वेगळं, प्रत्यक्ष समाज सुधारण्यासाठी योगदान देण्याची बाब वेगळी असते. कारण समाज सुधारणेतील योगदान हे समर्पित, अहंकार विरहित आणि नि:स्वार्थी भावनेने असते. सुधारणा झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. वाटणं स्वाभाविक आहे, पण आपण सुधारणा ही दुसऱ्याकडून गृहीत अपेक्षित धरतो आणि आपण स्वतःला वजा करतो. हे कोणतं परिवर्तन आहे. परिवर्तन होण्याची इच्छा आपण बाळगत असू तर सुरुवात ही कधीही स्वतःपासून झाली पाहिजे. बोलणं आणि आचरण यामध्ये अंतर नसेल तर लोक त्या शब्दांना महत्त्व देतात. अन्यथा दैनंदिन सूर्य उगवला की कित्येक विचार निर्माण होतात आणि सूर्यास्ताबरोबर ते विचारही संपुष्टात येतात. म्हणून विचारांना कृतीची जोड असलीच पाहिजे आणि विचारांना कृतीची जोड नसली तर मग मात्र पोकळ विचार निरर्थक ठरतात. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ ही उक्ती शंभर टक्के तर्कसंगत आहे. एखादी बाब आपण लोकांना सांगत असताना आपण कोण, काय आणि आपण त्या मार्गावर कुठे आहोत त्याला खूप मोठं महत्त्व आहे. स्वतःमध्ये परिवर्तन करून लोकोपयोगी आचरण केले की लोक आपोआप आचरण करतात. परिवर्तनाला सुरुवात स्वतःपासून केली तर त्या परिवर्तनाचे क्रांतीमध्ये रूपांतर होते. सध्या राज्यातील गावागावात, गल्लोगल्ली समाज सुधारक, समाजसेवक यांची मांदियाळी निर्माण झाली आहे. स्वयं घोषित विचारांवतांचे अगदी पेव फुटले आहे. प्रत्येकजण दुसऱ्यांना उपदेश करत आहे. आपण स्वतः कसे आणि किती प्रचंड आणि महान विद्वान आहेत हे लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी नानाविध प्रयत्न करून धडपड करताना आपण अनेक विद्वानांना आपल्या डोळ्यांनी पाहतोय. असे प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही पण खऱ्या अर्थाने समाजसुधारक, समाजसेवक किंवा विद्वान होऊन समाजाला दिशा द्यायची असेल तर सर्वप्रथम आपण स्वतःला दिशा द्यावी लागेल. आपण स्वतःला दिशा देऊन स्वतःमध्ये अपेक्षित बदल घडवून आणू तेव्हा मात्र आपल्यामध्ये झालेला बदल पाहून अनेक लोक आपलं अनुकरण नक्कीच करतील यामध्ये तीळमात्र शंका नाही. म्हणून समाज परिवर्तन हे कृतीतून आणि कृती ही स्वतःपासून सुरुवात होण्याची आवश्यकता असते. असं झालं तरच दिशादर्शक क्रांतिकारक परिवर्तन होतं अन्यथा ‘बोलाचा भात बोलाची कढी’ यापलीकडे फारसं काही निष्पन्न होत नाही. इतिहास अवलोकन केले तर एक बाब प्रकर्षाने जाणवते की, जे जे समाजसुधारक, समाजसेवक, विचारवंत, विद्वान होऊन गेले त्यांनी सर्वप्रथम स्वतःला उपदेश केला आणि त्या उपदेशाचे अनुकरण स्वतः केले. मग नंतर लोकांनी आपोआप अनुकरण केले. म्हणजे लोक हे कृतिशील परिवर्तनाचे अनुकरण करत असतात म्हणून लोक परिवर्तन हे कृतिशील झालं पाहिजे तेव्हाच ते एक योग्य दिशेला पोहोचतं.

Comments
Add Comment

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट होईल.

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी -विनायक बेटावदकर कल्याण शहरात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा

भारतातील बगलामुखी देवीची ही मंदिरे तुम्ही पाहिली का...या नवरात्रीमध्ये नक्की जा दर्शनाला जा.कोर्टाची कामे मार्गी लागतील.

भारतातील बगलामुखी देवीची ही मंदिरे तुम्ही पाहिली का...या नवरात्रीमध्ये नक्की जा दर्शनाला जा.कोर्टाची कामे