केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते ‘श्रीं’ची पूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.




अमित शाह यांनी वर्षा निवासस्थानी घेतले ‘श्रीं’चे दर्शन


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्निक भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


अमित शाह यांनी घेतले वांद्रे सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीचे दर्शन


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सहकुटुंब दर्शन घेत पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments
Add Comment

मुंबईतील ०८ प्रभाग समित्या भाजप राखणार

मुलुंड,भांडुपची एस अँड टीची प्रभाग समितीचा अध्यक्ष ठरणार ईश्वर चिठ्ठीवर? सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेची

राज्यात ठिकठिकाणी महापौर पदासाठी रस्सीखेच

प्रमुख महापालिकांत सत्तास्थापनेचे गणित बनले गुंतागुंतीचे ठाण्यात ‘अडीच वर्षां’वरून तणाव कोल्हापूर, अकोला,

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे गेट वे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या सर्व भागासाठी, वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज,

राजपत्रात नावे घोषित न झाल्याने कोकण भवनातील नगरसेवकांची नोंदणीच लांबली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचा महापौर कोण होणार आणि कधी होणार याची चर्चा रंगली असली तरी प्रत्यक्षात अद्यापही

नोबेल मिळत नाही म्हणून संतापले ट्रम्प, केली धक्कादायक कृती

वॉशिंग्टन डीसी : जागतिक महाशक्ती अशी ओळख मिरवणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वागणं दिवसागणिक

नितीन नवीन होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री नितीन नवीन यांची भाजपच्या