
https://www.youtube.com/watch?v=TbszWtjwGPU
अमित शाह यांनी वर्षा निवासस्थानी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्निक भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अमित शाह यांनी घेतले वांद्रे सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीचे दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सहकुटुंब दर्शन घेत पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.