हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष टीकाराम समरीत (वय २९, रा. खमारी, जि. भंडारा) हा त्याच्या साथीदारांसोबत पर्यटनासाठी शुक्रवारी आला होता. त्यांनी कळसुबाई शिखर पूर्ण केले होते. परत आज शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ते हरिहर किल्ला येथे ट्रेकिंगसाठी आले होते.


यावेळी उतरत असताना सुमारे १२ वाजेच्या सुमारास आशिष समरीत याचा तोल जाऊन तो साधारण शंभर फूट खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर वनविभाग व स्थानिक गावकरी यांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments
Add Comment

Solapur Flood : पहिला महामार्ग बंद अन् आता 'वंदे भारत'लाही फटका...सीना नदीच्या पुरामुळे सोलापूरमध्ये पूरस्थिती गंभीर

सोलापूर : राज्यात पावसाने जोर धरल्यामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. सोलापुर जिल्ह्यातील

Devendra Fadanvis : अतिवृष्टीने माढ्यात शेतीचं मोठं नुकसान, मुख्यमंत्री फडणवीसांची थेट पाहणी, मदतीचे आश्वासन

सोलापूर : महाराष्ट्रात पावसाचा तुफान थैमान सुरू असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली

Ajit Pawar : अतिवृष्टीने झोडपलेल्या शेतकऱ्यांना अजितदादांकडून मदतीचा मोठा दिलासा; अटसुद्धा रद्द

धाराशिव : राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागांना मोठा फटका

शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डीचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन

पुणे : शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगाव चे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद; वाहनांच्या रांगा

पुणे : राज्यातील काही भागात पावसानं थैमान घातलंय. दुष्काळी गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानं गंभीर स्थिती निर्माण

Rain Update : मराठवाड्यात पावसाचा कहर, राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

सोलापूर: मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सातत्याने सुरू असलेल्या