
मुंबई: सॅमसंगने आपला नवीन बजेट स्मार्टफोन, Samsung Galaxy A17 5G, भारतात लाँच केला आहे. हा फोन दमदार फीचर्स आणि आकर्षक डिझाइनसह बाजारात दाखल झाला आहे. याची सुरुवातीची किंमत १८,९९९ रुपये आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रे अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
किंमत आणि व्हरायंट्स:
६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेल: ₹ १८,९९९
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेल: ₹ २०,४९९
८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मॉडेल: ₹ २३,४९९ बँक कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना ₹ १,००० ची सूटही मिळू शकते.
प्रमुख वैशिष्ट्ये:
डिस्प्ले: ६.७ इंचचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले, ९० Hz रिफ्रेश रेटसह. गोरिल्ला ग्लास विक्टसचे प्रोटेक्शन दिले आहे.
प्रोसेसर: सॅमसंगचा स्वतःचा Exynos 1330 ऑक्टा-कोर प्रोसेसर.
कॅमेरा: यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे, सोबत ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी: ५००० mAh ची मोठी बॅटरी, जी २५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
सॉफ्टवेअर: हा फोन Android 15 आधारित One UI 7 वर चालतो. कंपनीने या फोनसाठी ६ वर्षांच्या OS आणि सुरक्षा अपडेट्सची हमी दिली आहे.
इतर फीचर्स: यात Gemini AI आणि Circle to Search सारखे AI फीचर्स आहेत. तसेच, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP54 रेटिंग आहे, जे फोनला धूळ आणि पाण्याच्या स्प्लॅशपासून वाचवते.