दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी संघटनांमध्ये 'ह्यूमन जीपीएस' (Human GPS) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बागू खान उर्फ ​​'समंदर चाचा' चकमकीत ठार झाला आहे. १९९५ पासून पीओकेमध्ये सक्रिय असलेल्या समंदर चाचाने आतापर्यंत १०० हून अधिक दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत केली होती. त्याचा मृत्यू दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का मानला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समंदर चाचासोबत आणखी एक पाकिस्तानी घुसखोरही मारला गेला आहे.



कोण आहे हा समंदर चाचा?


बागू खान उर्फ ​​समंदर चाचा १९९५ पासून पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये राहत होता. भारतीय सुरक्षा दलाच्या मते, गेल्या तीन दशकांत तो गुरेझ सेक्टर आणि आसपासच्या भागातून १०० हून अधिक घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होता, त्यापैकी बहुतेक यशस्वी झाले. या परिसरातील कठीण टेकड्या आणि गुप्त मार्गांबद्दलचे त्याचे सखोल ज्ञान त्याला दहशतवादी संघटनांसाठी खूप खास बनवत असे.



दहशतवाद्यांचा  'ह्युमन जीपीएस'


बागू खान हा हिजबुल कमांडर होता, असे असले तरी तो फक्त एका दहशतवादी संघटनेपुरता मर्यादित नव्हता. त्याने जवळजवळ प्रत्येक दहशतवादी संघटनेला घुसखोरीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात मदत केली. म्हणूनच दहशतवादी त्याला 'ह्यूमन जीपीएस' म्हणत असत.


सूत्रांनी सांगितले की, २८ ऑगस्टच्या रात्री जेव्हा तो नौशेरा नार परिसरातून पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा सुरक्षा दलांनी त्याला घेरले. समंदर चाचा आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक दहशतवादी चकमकीत मारला गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत परिसरात गोळीबार आणि शोध मोहीम सुरू होती. समंदर चाचा गेली अनेक वर्ष भारतीय सुरक्षा दलांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी होत होता. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, समंदर चाचा याचा मृत्यू दहशतवादी संघटनांच्या लॉजिस्टिक्स नेटवर्कला मोठा धक्का आहे. त्यांच्या मृत्यूमुळे घुसखोरीच्या अनेक संभाव्य योजना उधळून लावल्या गेल्या आहेत.

Comments
Add Comment

पूनम पांडे होणार मंदोदरी, दिल्लीत रामलीला सुरू होण्याआधी भडकलं महाभारत

नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रम सोमवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू होत आहे. पण हा

जीएसटी दर कपातीत सुमारे ३७५ वस्तू होणार स्वस्त

मुंबई : जीएसटी दर कपातीनंतर आता स्वयंपाकघरातील वस्तूंसोबत इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, उपकरणे आणि वाहनांपर्यंत सुमारे

'घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू होणार GST उत्सव'

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवसापासून अर्थात सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून देशात GST उत्सव सुरू होत आहे. यामुळे

घटस्थापनेच्या दिवशी पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवशी अर्थात सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश

PM Modi Address to Nation: पंतप्रधान मोदी आज करणार महत्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५.०० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यात ते अनेक महत्वपूर्ण

अमूलने ७०० हून अधिक उत्पादनांचे दर कमी केले, २२ सप्टेंबरपासून नवीन किंमती लागू

नवी दिल्ली: अमूल (Amul) या लोकप्रिय ब्रँडची मार्केटिंग करणारी कंपनी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF)