
मोहित सोमण:आजही डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने रूपया नव्या निचांकी पातळीवर घसरला आहे. आज सकाळी प्रति डॉलर किंमत पातळी ८८.१५ रूपयांवर गेली. ज्यामुळे रूपयात मोठे नुकसान झाले आहे. काल ५१ पैशाने व आज ६ पैशाने घसरण झाल्याने ही गेल्या काही महिन्यातील सर्वाधिक घसरण मानली जात आहे. युएसने भारतावर लावलेल्या अतिरिक्त टॅरिफचा फटका सर्वाधिक प्रमाणात रूपयाला बसल्याने घरगुती गुंतवणूकदारांना व निर्यातदारांना सर्वाधिक नुकसान झाले. याशिवाय टेक्नि कल बेसिसवर मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याने परकीय चलनाचा बहिर्वाह (Outflow) गेल्याने भारतीय चलनात दबावपातळी निर्माण झाली. तरीदेखील केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आगामी काळात निर्यात वाढीसाठी विशेष उपाय करणार आहे असे सांगितले असल्याने आगामी काळात निर्यातदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
यावर बोलताना, अमेरिकेने वाढत्या कर लादल्यामुळे, परकीय निधीचा सततचा बाहेर पडणे आणि महिन्याच्या अखेरीस डॉलरची मागणी वाढल्याने रुपया सतत दबावाखाली असल्याचे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. गुरूवारी रूपया डॉलरच्या तुलनेत ११ पैशांनी वाढला असला तरी शुक्रवारी आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८७.७३ वर उघडला, नंतर तो घसरला आणि ८८.३३ या त्याच्या आजच्या सर्वात कमी पातळीवर आला. देशांतर्गत चलन दिवसभरासाठी ८८.०९ या ग्रीनबॅकच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर स्थिरावले. मागील बंद दराच्या तुलनेत ५१ पैशांनी घसरण नोंदवली. आजही रूपयात घसरण झाली आहे.
२२ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ४.३८६ अब्ज डॉलर्सने घसरून ६९०.७२ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे, असे आरबीआयने शुक्रवारी सांगितले आहे. मागील अहवाल आठवड्यात एकूण परकीय चलन साठा १.४८८ अब्ज डॉलर्सने वाढून ६९५.१०६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता.