
प्रतिनिधी:अखेर ज्या क्षणाची वाट ॲपलचे चाहते पाहत होते तो क्षण आता जवळ आला आहे. अखेर आयफोन १७ भारतात दाखल लवकरच दाखल होत आहे. ॲपलच्या अधिकृत संकेतस्थळावर कंपनीने स्मार्टफोनचा नवा टिझर प्रदर्शित केल्याने भारतीय बाजा रातही याविषयी कुतुहल निर्माण झाले. ९ सप्टेंबरला हा स्मार्टफोन लाँच होणार असून भारतात रात्री १०.३० वाजल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चाहत्यांना पाहता येईल. युएस मध्ये हा कार्यक्रम सकाळी १० ला प्रक्षेपित होईल. आयफोन १७ (I Phone 17) मध्ये चार वेरिएंट येण्याची शक्यता आहे ज्यामध्ये आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो, आयफोन प्रो मॅक्स हे चार प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील.
फोनमध्ये आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. माहितीनुसार, १७ सिरिजचा डिस्प्ले १६ प्रमाणेच असण्याची शक्यता आहे. आयफोन १७ प्रो व आयफोन १७ प्रो मॅक्सची स्क्रिन ६.३ व ६.९ इंचाची असू शकते. आयफोन प्रो स्क्रीनची लांबी आयफोन १७ प्रमाणेच असू शकते. आयफोन एअरची लांबी या दोन स्मार्टफोन उंचीच्या मध्यम आकाराची असू शकते. विशेष म्हणजे आयफोनला १२ जीबी रॅम असू शकते. यापूर्वी आयफोन १६ ला ८ जीबीपर्यंत रॅम उपलब्ध होती. त्यामुळे अँपलच्या ए आय फिचर्ससह फास्ट मल्टिटास्किंग ग्राहकां ना करता येणार आहे.
एका अहवालातील माहितीनुसार,आयफोन १७ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये ४८ मेगापिक्सेलचा मुख्य लेन्स कॅमेरा, पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि अल्ट्रा-वाइड लेन्ससह ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असू शकतो असे म्हटले जात आहे. मागील आयफोन सिरिज मधील १२ मेगापिक्सेल आवृत्त्यांपेक्षा हा एक मोठा अपग्रेड असेल. दरम्यान, आयफोन १७ एअरमध्ये ४८ मेगापिक्सेलचा सिंगल रियर कॅमेरा असू शकतो, तर स्टँडर्ड आयफोन १७ मध्ये ४८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर असू शकतो. आयफोन प्रोडक्ट लाईनअपमध्ये स्लिम डिझाइन, iOS 26 आणि सुधारित कामगिरीसाठी Apple चा नवीन A19 चिपसेट असण्याची अपेक्षा आहे. डिस्प्ले अपग्रेडमध्ये सर्व मॉडेल्समध्ये 120Hz प्रोमोशन OLED पॅनेल समाविष्ट असू शकतो.
किंमतीच्या बाबतीत आयफोन १७ आयफोन १६ तुलनेत आणखी महाग असू शकतो. बाजारातील उपलब्ध रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आयफोन १७ ची किंमत ८९९९० पासून सुरू होणार असून आयफोन एअर ९९९९०, आयफोन प्रो १३४९९०, आयफोन १६४९९९ रूपयांपर्यंत असू शकते. कंपनीने यावर अजूनही कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.