Gold Silver Rate: सोन्यात 'हिमालयीन' वाढ चांदीतही वाढ कायम !

मोहित सोमण:सोन्याच्या दरात हिमालयाएवढी वाढ झाली असून चांदीच्या दरातही आज मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर नव्या उच्चांकावर आज गेला. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेसह रूपयात झालेल्या निचांकी घसरणीचा फटका मोठ्या प्रमाणात भा रतीय सराफा बाजारात बसला आहे ज्यामुळे सोन्यात महाकाय वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६४ रूपयांंनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरा त १२३ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी १०४९५ रूपये, २२ कॅरेटसाठी ९६२० रूपये,१८ कॅरेटसाठी ७८७१ रूपयांवर पोहोचले आहेत.सोन्याच्या प्रति तोळा दरातही मोठी वाढ झाली असून संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १६४० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १५०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १२३० रूपयांनी वाढला आहे. ज्यामुळे प्रति तोळा सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी १०४९५० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी ९६२०० रूपयां वर, १८ कॅरेटसाठी ७८७१० रूपयांवर पोहोचला आहे. भारतात मुंबईसह प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०४९५ रूपये, २२ कॅरेटसाठी ९६२० रूपये,१८ कॅरेटसाठी ७९५५ रूपयांवर गेले आहेत.


जागतिक पातळीवरील सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात आज संध्याकाळपर्यंत १.२०% इतकी प्रचंड वाढ झाली आहे. तर जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.९०% इतकी वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपात ळी ३४४८ औंसवर गेली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) संध्याकाळपर्यंत ०.०४% घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याची दरपातळी बाजारात १०३७८० रूपयांवर गेली आहे.आज दिवसभरात जाग तिक सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाली होती. अमेरिकेतील अस्थिरतेचा फटका सोन्यात आज मोठ्या प्रमाणात बसला. डॉलरच्या निर्देशांकात मोठी वाढ होत असताना रूपयातील उच्चांकी घसरणीचा फटका सोन्यात आज बसला. असे असले तरी युएस फेड व्या जदरात कपातीवर अजूनही अनिश्चितता असल्याने तसेच भारतीय अस्थिरतेत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देत असल्याने ईटीएफसह कमोडिटी बाजारात मागणीपेक्षा पुरवठा घटल्याने सोन्याच्या वाढ झाली आहे. याशिवाय सणासुदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक अपेक्षित असल्याने सोन्यातील मागणी वाढली.आधीच जागतिक फटका बसत असल्याने भारतीय बाजारातील आणखी टॅरिफ अनिश्चितेचा अतिरिक्त फटका बाजारात बसत आहे.


चांदीच्या दरातही मोठी वाढ !


काल झालेल्या घसरणीनंतर चांदीच्या मागणीतही आज वाढ झाली आहे. परिणामी चांदीच्या जागतिक पातळीवरील मागणीत वाढ झाल्याने दरपातळी आणखी उंचावली. आगामी काळात मोठ्या प्रमाणात चांदीत वाढीची शक्यता असली तरी सोन्याच्या तुलनेत गे ल्या आठवड्यात चांदीतही मर्यादित हालचाल नोंदवली गेली. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १.१० रूपयाने वाढ झाली असून प्रति किलो दर ११०० रूपयांनी वाढला आहे. त्यामुळे चांदीचे प्रति ग्रॅम १२१ रूपये, प्रति किलो दर १२१००० रुप यांवर गेला आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १३१० रूपये, प्रति किलो दर १३१००० रूपयांवर कायम आहेत. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत तब्बल २.५८% वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.१०% घसरण झाली असून चांदीची दरपातळी १२०२५०.०० रूपयांवर पोहोचली आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पुन्हा लोळवले, आशिया कपमध्ये दुसऱ्यांदा केला पराभव

दुबई: आशिया कप २०२५च्या सुपर ४मध्ये भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा

पूनम पांडे होणार मंदोदरी, दिल्लीत रामलीला सुरू होण्याआधी भडकलं महाभारत

नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रम सोमवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू होत आहे. पण हा

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज

मुंबई : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले, त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची

'घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू होणार GST उत्सव'

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवसापासून अर्थात सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून देशात GST उत्सव सुरू होत आहे. यामुळे

घटस्थापनेच्या दिवशी पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवशी अर्थात सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश