युक्रेनच्या माजी संसद सभापतींची गोळ्या घालून हत्या

ल्विव्ह: पश्चिम युक्रेनमध्ये एका प्रमुख युक्रेनियन राजकारणी आणि माजी संसद सभापतींची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या बातमीने जगभरात खळबळ माजली असून, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हत्येचा 'भयानक खून' या शब्दांत निषेध केला आहे.

युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेचे सचिव म्हणूनही काम केलेले आंद्री पारुबी यांची शनिवारी ल्विव्ह शहरात हत्या करण्यात आली. अभियोजक जनरलच्या कार्यालयाने सांगितले की, एका बंदूकधारी व्यक्तीने पारुबीवर अनेक गोळ्या झाडल्या आणि त्यात ते जागीच ठार झाले. हल्लेखोर पळून जाण्यास यशस्वी ठरला,  सध्या त्याचा शोध सुरू असल्याचे म्हंटले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हत्येचा "भयानक खून" म्हणून निषेध करत पारुबीच्या कुटुंबाना आणि मित्र परिवारांना संवेदना आणि शोक व्यक्त केला. संबंधित हल्लेखोराचा तपास लवकरात लवकर घेण्यासाठी आवश्यक सैन्य आणि साधने कामाला लागली असल्याची माहिती देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली.

पारुबी यांची राजकीय कारकीर्द


५४ वर्षीय पारुबी हे युक्रेनचे संसद सदस्य होते, एप्रिल २०१६ ते ऑगस्ट २०१९ पर्यंत त्यांनी संसदीय सभापती म्हणून काम पाहिले होते. २०१३ आणि २०१४ मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणात निदर्शनांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यांच्यावर हा हल्ला का करण्यात आला या बद्दलचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ल्विव्हचे महापौर आंद्री सदोवी यांनी देखील पारुबी यांच्या हत्येच्या बतमीवर शोक व्यक्त करत, मारेकऱ्याला शोधणे आणि हल्ल्याची परिस्थिती स्थापित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच "युद्ध सुरू असलेल्या देशात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, इथे असे कोणतेच ठिकाण नाही जे सुरक्षित राहिले आहे," असे त्यांनी टेलिग्रामवर लिहिले आहे.

सध्या इस्रायल आणि युक्रेन यांमधील संघर्ष पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच, रशियाने युक्रेनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला उधळून लावत त्याच्या प्रत्युत्तरादाखल युक्रेनवर ड्रोन हल्ले चढविले आहेत.  रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने शनिवारी क्रिमिया आणि इतर भागात २० युक्रेनियन ड्रोन पाडल्याचे सांगितले तर. दुसरीकडे रशियाने युक्रेनच्या १४ प्रदेशांमध्ये ५०० हून अधिक ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्रे डागली आहेत.
Comments
Add Comment

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या