कोलकाता: आज असा कोणताच व्यक्ति दिसणार नाही, ज्याच्याकडे मोबाईल नाही. मोबाईल आज मूलभूत गरजेची वस्तु बनत चालला असून, त्याशिवाय राहणे अनेकांना शक्य नाही. दैनंदिन जीवनपयोगी बनलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर ज्या वेगाने वाढत चालला आहे, त्याच वेगाने त्याच्याशी संबंधित गुन्हेगारांची संख्याही वाढत चालली आहे. अलीकडेच कोलकातामध्ये घडलेली घटना याच संबंधात आहे.
अलीकडेच एक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट अंगाला काटा आणणारी आहे. कारण, कोलकातामधील फोन दुरुस्ती करणाऱ्या एका दुकानदाराने एका महिला ग्राहकाच्या मोबाईलमधील खाजगी व्हिडिओ लीक केले. आपण अनेकदा आपला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी खाजगी मोबाईलच्या दुकानात जातो. यादरम्यान अनेकदा दुकानदार मोबाईल काही तासांसाठी किंवा एक दिवसासाठी ठेवून घेतात. अशावेळी या प्रकारचे दुष्कृत्य घडू शकते, याचे मोठे उदाहरण म्हणजे ही घटना!
संबंधित तरुणीचे खाजगी व्हिडिओ आशाप्रकारे लिक झाल्याचा मोठा धक्का तिला बसला आहे. यासंदर्भात सायबर गुन्हे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून. पोलिसांनी पिढीत महिलेची तक्रार घेऊन ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.