Friday, August 29, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात सलग तिसऱ्यांदा घसरण 'या' कारणामुळे सेन्सेक्स २७०.९२ व निफ्टी ७४.०५ अंकाने घसरला !

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात सलग तिसऱ्यांदा घसरण 'या' कारणामुळे सेन्सेक्स २७०.९२ व निफ्टी ७४.०५ अंकाने घसरला !

मोहित सोमण: आज अखेरचे सत्र गुंतागुंतीचे होते. सकाळची किरकोळ वाढ अखेरीस घसरण बदललेली आहे. सलग तिसऱ्यांदा बाजारात घसरण झाली आहे. आज ब्लू चिप्स कंपनीच्या समभागात मोठी घसरण झाली असून निर्देशांकातील सपोर्ट लेवलही गाठ ण्यास बाजाराला यश आले नाही. जागतिक परिस्थिती पाहता विशेषतः युएस आकडेवारीनंतरही बाजारात घसरणच झाली. परिणामी निफ्टी २४५०० ची पातळीही गाठू शकला नाही. आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर घसरणीनेच झाल्यामुळे सेन्सेक्स २७ ०.९२ अंकाने व निफ्टी ७४.०५ अंकाने घसरला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ७९८०९.६५ पातळीवर व निफ्टी २४४२६.८५ पातळीवर स्थिरावला आहे. बँक निर्देशांकात सकाळची वाढ घसरणीत बदलली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात अखेरीस ८८.०२ व बँक निफ्टीत १६४.७० अंकाने घसरण झाली. बीएसईत (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४१%,०.२९% घसरण झाली आहे. एनएसईत (NSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५७%,०.३९% घसरण झाली आहे. विशेष म्हणजे अस्थिरता निर्देशांक (VIX Vol atility Index) ३.४९% घसरण झाली आहे.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात अखेरीस बहुतांश निर्देशांकात घसरणच झाली आहे. एफएमसीजी (०.९५%), मिडिया (०.३५%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली असून सर्वाधिक घसरण मात्र ऑटो (०.८८%), आयटी (०.८७%), रिअल्टी (१.३३%), मिडस्मॉल फायनां शियल सर्विसेस (०.९५%), तेल व गॅस (१.०१%) समभागात झाली. विशेषतः आज रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली ज्यामध्ये कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुढील वर्षी जिओचा आयपीओ येणार असल्याचे घोषित केले आहे. अ से असतानाही कंपनीच्या शेअरमध्ये २.१६% घसरण झाली आहे. जागतिक पातळीवरील दबावाचा फटका असताना आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. मात्र गेल्या तीन सर्वसाधारण बैठकीप्रमाणे बैठक संपल्यानंतर शेअर कोसळण्याचा ट्रेड यावर्षीही कायम राहिला आहे. महत्वाचे म्हणजे काल युएसची सुधारित आकडेवारी जाहीर झाली आकडेवारीनुसार जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत अमेरिकेच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (Gross Domestic Product GDP) वार्षिक ३.३% वाढ झाली, जी डाऊ जोन्सच्या ३.१% च्या सर्वसंमतीच्या अंदाजापेक्षा आणि वाणिज्य विभागाच्या ३% च्या सुरुवातीच्या अंदाजापेक्षा जास्त झाली आहे या कारणामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा उत्साह काल युएस बाजारात बसला होता. मात्र अमेरिकेच्या ट्रेझरी (वित्तीय कोषात) १० वर्षातील सर्वाधिक घसरण झाल्याने युएस बाजारातील रॅली मर्यादित राहिली होती. आज गिफ्ट निफ्टीवाढीसह सकाळच्या सत्रात बाजारात वाढीचे संकेत मिळत होते. सुरवातीला सेन्सेक्स व निफ्टीत किरकोळ वाढ देखील झाली. पण टॅरिफचा दबाव अनेक समभागात जाणवल्याने आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी होल्डिंग्स राखले असल्याची शक्यता आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) यांच्याकडून सेल ऑफ झाले की नाही ते उद्याच्या सत्रात स्पष्ट होईल परंतु तुर्तास ही सेल ऑफची शक्यता अधिक आहे. ब्लू चिप्ससह मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटका बाजारात बसला.

आज मात्र युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.२७%) बाजारात घसरण झाली आहे तर एस अँड पी ५०० (०.३२%), नासडाक (०.५३%) बाजारात वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (०.३०%) सह निकेयी २ २५ (०.२०%), तैवान वेटेड (०.०१%), जकार्ता कंपोझिट (१.५५%), कोसपी (०.३२%) बाजारात घसरण झाली आहे तर स्ट्रेट टाईम्स (०.३७%), हेंगसेंग (०.५१%), शांघाई कंपोझिट (०.३७%) बाजारात वाढ झाली आहे. आज जागतिक सोन्याच्या निर्देशांकात संध्या काळपर्यंत घसरण झाली आहे. आज दिवसभरात सोन्याचा जागतिक दरात दुपारपर्यंत वाढ झाली होती. वाढलेल्या मागणीसह वाढलेल्या स्पॉट बेटिंगमुळे तसेच टॅरिफ दबावासह वाढलेल्या युएस जीडीपीतील आकडेवारीमुळे सोन्याच्या मागणीतही मोठी वाढ झा ली. जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२३% घसरण झाली असून डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाल्याने सोन्याची दरपातळी भारतात वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमतींतही टॅरिफचा दबाव असूनदेखील जीडीपी सु़धारित आकडेवारीमुळे घसरण झाली आहे. ज्यामुळे गोल्ड स्पॉट बेटिंगमध्ये वाढ मर्यादित राहिली. परिणामी मागणीत घसरण झाली. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.४२% व Brent Future निर्देशांकात ०.६४% घसरण झाली आहे.

बाजारातील अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ग्रॅन्युल्स इंडिया (५.३५%), सम्मान कॅपिटल (५.०८%),नावा (४.७९%), सीजी पॉवर (४.५६%), आरबीएल बँक (४.०७%), एचबीएल इंजिनिअरिंग (३.३६%), रेडिंगटन (२.४२%), कोलगेट पामोलीव (३.०५%), येस बँक (२.२५%), युनायटेड स्पिरीट (२.३०%), दालमिया भारत (२.१३%), सीसीएल प्रोडक्ट (२.०७%), फिनोलेक्स इंडस्ट्रीज (१.९७%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (१.८०%), क्रिसील (१.६४%), श्रीराम फायनान्स (१.५०%) समभागात झाली आहे.बाजारातील अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण वर्धमान टेक्सटाईल (५.७४%), जिंदाल स्टेन (५.३९%), आयडीबीआय बँक (४.७२%), स्वान एनर्जी (३.८६%), बीएसई (२.७७%), जेपी पॉवर वेचंर (२.९६%), एचडीएफसी एएमसी (२.१३%), रिलायन्स इंडस्ट्रीज (२.०७%), सोनाटा सॉफ्टवेअर (२.०५%), इन्फोऐज इंडिया (२.०१%), इन्फोसिस (२.०१%), झी एंटरटेनमेंट (१.८४%), महानगर गॅस (१.७७%), भारत फोर्ज (१.५९%), एनएचपीसी (१.४२%), डीएलएफ (१.३९%), अदानी एंटरप्राईजेस (१.३४%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस लिमिटेडचे वेल्थ मॅनेजमेंट सिद्धार्थ खेमका म्हणाले आहेत की,' या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय निर्यातीवर अमेरिकेने ५०% वाढीव कर लादल्याच्या चिंतेमुळे निफ्टी ७४ अंकांनी घसरून २४,४२७ (-०.३%) वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप१०० आणि स्मॉलकॅप१०० मध्ये अनुक्रमे ०.६% आणि ०.४% ची घसरण झाली. ३-४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिल बैठकीबद्दलच्या आशावादामुळे निफ्टी एफएमसीजी निर्देशांक १% ने वाढला. शिवाय, पंतप्रधान मोदींच्या एससीओ शिखर परिषदेसाठी आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या बहुप्रतिक्षित चीन दौऱ्यादरम्यान बाजार कोणत्याही सकारात्मक घडामोडींवर लक्ष ठेवण्याची शक्यता आहे - ही त्यांची सात वर्षांतील पहिली भेट आहे. चार दिवसांच्या या दौऱ्यात, ज्यामध्ये जपानची भेट देखील समाविष्ट आहे, भारत जागतिक व्यापार संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना येत आहे. मॅक्रो फ्रंटवर, भारताच्या औद्योगिक उत्पादनाने (IIP) जुलैमध्ये वेग घेतला, जो ३.५% या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, जो मुख्यत्वे उत्पादन क्षेत्रामुळे चालना मिळाली. दरम्यान, कमी आयात आणि मजबूत ग्राहक खर्चामुळे अमेरिकेच्या दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा अंदाज सुधारित करून तो जुलैमधील ३.०% वरून ३.३% करण्यात आला. एकूणच, भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटी आणि जागतिक नेत्यांसोबतच्या भारताच्या धोरणात्मक बैठकींमधील घडामोडींचा मागोवा घेऊन, बाजार श्रेणीबद्ध पद्धतीने व्यापार करेल अशी आमची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, सोमवारी बाजार भारताच्या दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी आणि शुक्रवारी बाजारानंतर जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीवर प्रतिक्रिया देतील.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,भारतीय शेअर बाजाराने आणखी एका दिवसात तोटा नोंदवला, ज्यामुळे सुधारात्मक पातळी वाढली. दैनिक चार्टवर, निर्देशांक १०० EMA च्या खाली आणखी घसरला आहे, जो खोल मंदीचा ट्रेंड दर्शवितो. आरएसआय (RSI) मंदीच्या क्रॉसओवरमध्ये आहे, जो सतत कमकुवतपणा दर्शवितो. अल्पावधीत, हा ट्रेंड कमकुवत राहू शकतो, ज्यामुळे निफ्टी २४०७१ पातळीवर असले ल्या २०० डीएमए (Daily Moving Average DMA) कडे ओढला जाऊ शकतो. खालच्या टोकावर, समर्थन २४४००/२४१५० पातळीवर आहे, तर वरच्या टोकावर, २४,६५० वर प्रतिकार दिसून येतो. जोपर्यंत निर्देशांक २४८५० पातळीच्या खाली राहतो तोपर्यंत "सेल ऑन राईज" धोरण श्रेयस्कर राहते.'

आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'रुपयाच्या घसरणीला बाजाराने प्रतिसाद दिल्याने सोन्याचे भाव सकारात्मक राहिले, COMEX सोन्याचा भाव $3405 च्या जवळ $3415-$3404 दरम्यान घट्ट पण अस्थिर श्रेणीत व्यवहार झाला. तथापि, रुपयाच्या कमकुवतपणामुळे MCX सोन्याला जवळजवळ ५०० रूपयांचा धक्का बसला, ज्यामुळे किमती १०२६०० रूपयांवर पोहोचल्या. वाढत्या व्यापार शुल्काच्या चिंता आणि भारत-अमेरिका व्यापाराशी संबंधित समस्यांमुळे सोने वाढतच आहे, तर रुपयाचे अवमूल्यन भारतीय बाजारपेठेत सोने अधिक महाग करते. येत्या काळात, सोन्याच्या किमती १००००० -१०५०००च्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.

आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर कर लागू केल्यानंतर दबाव वाढल्याने रुपया ८८.२० रूपयांच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला आणि त्यात आणखी ०.६० (०.७०%) घसरण झाली. यामुळे वाढत्या राजकोषीय तुटीबद्दल चिंता निर्माण झाली आहे. जीएसटी परिषदेच्या आगामी निर्णयामुळे काही आधार मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु बाजार निर्णायक दृष्टिकोन घेण्यापूर्वी अंतिम जीएसटी बदलांबाबत स्पष्टतेची वाट पाहत आहेत. भावना कमकुवत राहिल्या आहेत आणि रुपया ८७.६५-८८.४५ च्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.'

त्यामुळे आज बाजारात घसरणी झाली असताना उद्या ही चौथ्यांदा घसरण कायम राहते का बाजारात नव्या ट्रिगरसह वाढ होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा