Maratha Andolan: मराठा आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी मिळाली, अटी व शर्ती लागू

मुंबई: मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली असून, मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित कार्यकर्त्यांसह केवळ एका दिवसासाठी आंदोलनाची परवानगी दिली होती, जी आता संपली आहे. मात्र त्यानंतर काय असा प्रश्न आंदोलक तसेच जनसामान्यांना पडला होता. जो आता सुटला असून, जरांगे यांना उद्याही आंदोलन सुरू ठेवता येणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळीच भाषण करताना आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली आहे.



उद्याच्या आंदोलनासाठी परवानगी मिळाली


उद्याच्या आंदोलनासाठी आझाद मैदानमध्ये परवानगी मिळण्यासाठी  पोलिसांकडे जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनास मुदतवाढीची परवानगी दिली असून आजचा प्रकार पाहता काही नियम व अटी त्यात असणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.



नियम आणि अटीवर आंदोलनाला परवानगी


मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलकांची संख्या ५ हजारांच्या आत ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम असून  मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लाखो मराठा आंदोलक संघटित झाले आहेत. ज्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर देखील झालेला पाहायला मिळाला. पावसामुळे आंदोलकांची गैरसोय झाली असली तरी, अनेकांनी रिकामी जागा, रेल्वे स्थानक परिसर तसेच बसथांब्यांवर आसरा घेतला. दरम्यान मंत्रालय, सीएसएमटी परिसरात शेकडो आंदोलकांनी मोर्चा वळवून घोषणा दिल्या. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना सांभाळणे ही मुंबई पोलिसांसमोरची मोठी कसोटी ठरली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न केल्याचा आरोपही केला आहे.



सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ


दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी यापूर्वी मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध दर्शवला होता. त्यानंतर आज झालेल्या आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा सदावर्ते यांनी जरांगेवर टिका केली. मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांनी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या अटी-शर्तींचे पालन न करता हे आंदोलन केल्याची तक्रार अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच, अटी व शर्तींचे पालन न केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.  त्यामुळे आंदोलनकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याआधी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा विचार करून पोलिसांनी क्रिस्टल टॉवर निवासस्थानाजवळ बंदोबस्त वाढवला आहे.


 
Comments
Add Comment

मुंबई अहमदाबाद महामार्गाबाबत मोठा निर्णय

मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २

Bombay High Court Bomb threat : मुंबई हायकोर्टाला पुन्हा बॉम्बची धमकी! पोलिस अलर्ट मोडवर

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा दहशतीचं सावट पसरलं आहे. उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी आल्याची माहिती समोर आली

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सात जणांना उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सात जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. एनआयए

iPhone 17 Pro साठी फ्रीस्टाइल हाणामारी, BKC मध्ये राडा

iPhone 17 Pro: अ‍ॅपलचे बहुप्रतीक्षित आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन एअरच्या विक्रीला आजपासून

'म्हाडासाथी' एआय चॅटबॉटचे लोकार्पण, म्हाडाचे आणखी एक तंत्रस्नेही पाऊल

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक लोकाभिमुख संस्था असून

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात