मुंबई : गणेशोत्सव सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या नव्या कामाची सुरुवात गणपतीचा आशीर्वाद घेत केली आहे. कोणी मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेऊन तर कोणी घरीच गणेशोत्सव साजरा करत बाप्पाच्या आशीर्वादाने नव्या कामाचा श्रीगणेशा केला. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि तिचा पती प्रतीक शाह यांनी गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर एक अलिशान कार खरेदी केली. हा आनंद चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी हृता आणि प्रतीकने सोशल मीडिया पोस्ट टाकली आहे.
लवकरच हृताचा आरपार नावाचा सिनेमा प्रदर्शित होत आहे. यामुळे उत्साहात असलेल्या हृताचा आनंद नव्या बीएमडब्ल्यू कारमुळे द्विगुणीत झाला आहे. हृता आणि प्रतीकने निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. या अलिशान कारचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच दोघांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.