
मोहित सोमण:आरबीआयचे माजी गव्हर्नर डॉ उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) या जागतिक दर्जाच्या संस्थेच्या कार्यकारी संचालक पदावर नेमणूक झाली आहे. मानव संसाधन मंत्रालयाने काही क्षणापूर्वी अध्यादेश जारी केला असून यामध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी पटेल यांची नेमणूक झाल्याचे स्पष्ट केले आहे. कॅबिनेट कमिटी नेमणूकीच्या सचिव व आस्थापना अधिकारी मनिषा सक्सेना यांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. पटेल यांनी जबाबदारीचा ताबा घेतल्यानंतर तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी ते कार्यरत असतील असे अध्यादेशात स्पष्ट करण्यात केले आहे.
जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ उर्जित पटेल यांची ओळख आहे. आयएमएफ या जागतिक दर्जाच्या वित्तीय संस्थेकडून भारताचे प्रतिनिधी म्हणून डॉ उर्जित पटेल महत्वाची भूमिका बजावतील. डॉ उर्जित पटेल यांनी सप्टेंबर २०१६ कालावधीत आरबीआयचे गर्व्हनर म्हणून पदभार हाती घेतला होता. रघुराम राजन यांच्यानंतर पटेल यांनी आरबीआयची सुत्रे हाती घेतली होती. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी कार्यकाळ समाप्तीच्या मुदतीपूर्वीच राजीनामा दिला होता. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ उर्जित पटेल यां नी आधीही आयएमएफसाठी काम केले आहे. १९९६ -१९९७ कालावधीत त्यांनी आयएमएफ तर्फे डेप्युटेशनवर आरबीआयची धुरा सांभाळली होती. जिथे त्यांनी कर्ज बाजार विकसित करणे, बँकिंग क्षेत्रात सुधारणा करणे, पेन्शन फंड अद्ययावत करणे आणि पर कीय चलन बाजार विकसित करणे यावर सल्ला दिला सेंट्रल बँकेला दिला होता.
आयएमएफचे कार्यकारी मंडळ त्यांचे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी जबाबदार असते. मंडळात इतर प्रातिनिधिक सदस्य देश किंवा गटांद्वारे निवडलेले २४ कार्यकारी संचालक असतात, ज्यांचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालक (Executive Chairman) कर तात. यापूर्वीही डॉ उर्जित पटेल यांनी केंद्रीय अर्थमंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार म्हणून १९९८ ते २००१ कालावधीत काम केले आहे. अर्थविषयक त्यांचा गाढा अभ्यास असून त्यांची जागतिक पातळीवर अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती आहे.