Friday, January 16, 2026

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे सांगतानाच मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. 48 तासांपासून एनडीआरएफच्या मदतीने हे बचाव कार्य राबवले जात आहे आणि ते पुढच्या काही तासात संपेल. आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा