‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

वडापाव म्हटले की जिभेला पाणी सुटते. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसेच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार होतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट ‘वडापाव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरवरून हा चित्रपट एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असणार हे स्पष्ट होते. हा चित्रपट प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असल्यामुळे ते पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरणार आहे. या चित्रपटामध्ये प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनर अंतर्गत, प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाचे अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत. तर सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल असून संजय मेमाणे हे चित्रपटाचे छाया दिग्दर्शक आहेत, तर सिद्धार्थ साळवी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे.
Comments
Add Comment

शोले आणि मुघल-ए-आझम पेक्षा १०० पट चांगला आहे 'धुरंधर २'

मुंबई : 'धुरंधर २' हा बहुचर्चित हिंदी चित्रपट गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी, शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

मुंबई : गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता

अमिताभ यांची अयोध्येत मालमत्ता खरेदी

अयोध्या : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत मालमत्ता खरेदी केली आहे. त्यांनी ‘हाऊस ऑफ अभिनंदन

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी