विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश


विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. सर्व मृतांची ओळख पटविण्यात आली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. वसई - विरार महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इमारत दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यात एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश आहे. मृतांमध्ये उत्कर्षा जोवील या एक वर्षाच्या चिमुरडीचा तसेच ११ वर्षांच्या अर्णव निवळकर याचाही समावेश आहे.


जखमी झालेल्यांपैकी प्रदीप कदम आणि जयश्री कदम या दोघांना उपचारांनंतर प्रकृती सुधारल्यामुळे डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली आहे. इतर सात जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातलगांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास राठोड, ग्रामीण रुग्णालय, विरार यांच्याशी ९५२७९६१२२१ या मोबाईलवर क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


मृतांची नावं : आरोही जोवील (२४), उत्कर्षा जोवील (१), लक्ष्मण सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया निवळकर (३८), अर्णव निवळकर (११), पार्वती सकपाळ (६०), दिपेश सोनी (४१), सचिन नेवाळकर (४०), हरिश बिष्ट (३४), सोनाली तेजाम (४१), दिपक बोहरा (२५), कशीश सहेनी (३५), शुभांगी सहेनी (४०), गोविंद रावत (२८), ओंकार जोवील (२६), रोहिणी चव्हाण (३५).


वसई - विरार महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एकूण २६ जण दबले होते. यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांना उपचार करुन घरी पाठवले आहे आणि इतर सात जणांवर उपचार सुरू आहेत. सर्व मृतांची ओळख पटली आहे. घटनास्थळी एनडीआरएफ करत असलेले मदतकार्य आता थांबवण्यात आले आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. पडलेल्या इमारतीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी नियमानुसार इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.


जखमींची यादी


उपचारांनंतर घरी सोडण्यात आलेले - प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३)


तुळींज हॉस्पिटलमध्ये असलेले जखमी - प्रभाकर शिंदे (५७), प्रेरणा शिंदे (२०)


प्रकृती हॉस्पिटल, बोळींज, विरार पश्चिम येथे असलेले जखमी - प्रमिला शिंदे (५०), संजॉय सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोवील (२४)


संजीवनी हॉस्पिटल, विरार पश्चिम येथे असलेले जखमी - मिताली परमार (२८)




Comments
Add Comment

PMPML चा पुन्हा कहर; नऊ वर्षांच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू, गरोदर बहीण गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड : शहरात अपघातांची मालिका सुरूच असून,एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या

बीएमसी शाळा खासगीकरण वादाने अधिवेशन तापले; अस्लम शेख–लोढा आमनेसामने

नागपूर : मालवणीतील बीएमसी टाऊनशिप शाळेच्या मुद्द्यावरून मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई उपनगरचे

बारामती, इंदापूर पुण्यात ईडीची छापेमारी १०८ कोटींच्या डेअरी घोटाळ्याप्रकरणी नियामकांची मोठी कारवाई

पुणे: निष्पाप गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबाबत व १०८.३० कोटी रुपयांच्या डेअरी घोटाळ्याप्रकरणी बारामती व इंदापूर

मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!

नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि

छोटी राज्ये चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात! - वेगळ्या विदर्भाबाबतच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

नागपूर : "छोटी राज्ये ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्यामुळे याबाबत भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला

IndiGo Airlines Crisis: सरकार अ‍ॅक्शन मोडवर ! डीजीसीएकडून सीईओ पीटर इलिबर्स यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स

मुंबई: इंडिगो एअरलाईन्स (Interglobe Aviation Limited) कंपनीचे सीईओ पीटर इलिबर्स यांना सरकारने चौकशीसाठी तत्काळ समन्स बजावले आहे.