मोहित सोमण: वर्धमान टेक्सटाईल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वादळ आले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर थेट १३.१७% उसळला आहे ज्यामुळे कंपनीच्या शेअरचा दर ४५०.३५ रूपयांवर सुरु होता. प्रामुख्याने दुपारपर्यंत ११% हून अधिक उसळ ला असून सकाळी शेअर बाजार सुरू झाल्यावरच कंपनीचा शेअर ९% हून अधिक पातळीवर उसळला होता.ही वाढ प्रामुख्याने केंद्र सरकारने टेक्सटाईल आयात केलेल्या कॉटन वस्तूंच्या ड्युटी मुक्तीला अधिक वाढीव मुदत दिली आहे. त्यामुळे आता टेक्सटाईल कंपन्यांना या निमित्ताने दिलासा मिळाला आहे. सरकारने ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली असल्याने तूर्तास टेक्सटाईल उद्योगांना दिलासा मिळाला.
दैनंदिन चार्ट पाहिल्यास कंपनीचा शेअर गेल्या पाच दिवसांच्या सत्रात २% वाढला आहे. तर गेल्या महिनाभरातील कामगिरी पाहता कंपनीच्या शेअरने मात्र गटांगळी खाल्ली आहे. मागील महिन्यात कंपनीचा शेअर ६.७% घसरला होता. सरकारच्या या निर्णयामुळे ११% आयातीवरील ड्युटी वाचल्याने गुंतवणूकदारांनी सरकारात्मक कौल कंपनीच्या शेअरला दिली आहे. सध्या कॉटन मार्केटमध्ये दिवसेंदिवस कच्च्या मालाची किंमत वाढ असताना या ड्युटी माफीने उत्पादनांच्या किंमती नियंत्रित होतील असा तज्ञांचा कयास आ हे. याशिवाय हे विस्तार उत्पादकांना कामकाज स्थिर करण्यासाठी आणि किफायतशीर स्पर्धात्मक राहण्यासाठी मोकळीक प्रदान करते. त्यामुळे कंपनीचा शेअर दिवसभरात उसळला आहे.