 
                            मोहित सोमण: आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर घसरणीत झाली आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स थेट ७०५.९७ अंकाने व निफ्टी २११.१५ अंकाने घसरला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८००८०.५७ व निफ्टी २४५००.९० पातळीवर स्थिरावला आहे. आजपा सून ट्रम्प यांच्या टॅरिफ शुल्क अध्यादेशाची युएस कस्टम विभागाने अंमलबजावणी सुरू केल्याने आज निर्यातदार व गुंतवणूकदारांमध्ये दबाव कायम राहिला. भारतावर ५०% टॅरिफची अंमलबजावणी होणार असल्याने विशेषतः आगामी व्यापारावर टांगती तलवार कायम राहिल्याने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात सेल ऑफ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ५८१.६७ अंकाने व बँक निफ्टीत ६३०.१० अंकांने घसरण झाल्याने आज बाजारात मोठे नुकसान झाले. मंगळवार प्रमाणेच फायनांशिय ल सर्विसेस, बँक, मिड स्मॉल, लार्जकॅपमध्ये या सगळ्याच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली ज्याचा फटका निर्देशांकात परावर्तित होत आहे.
सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये १.०९%,०.९६% इतकी मोठी घसरण झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.२७%,१.२७% नुकसान झाल्याने बाजाराला आज २४६०० ची सपोर्ट लेवलही मिळू शकली नाही. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात कंज्यूमर ड्युरेबल्स (०.९६%) वगळता इतर निर्देशांकात घसरणच झाली. गुंतवणूकदारांना आज सर्वाधिक नुकसान मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.४४%),फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.३८%), मिडस्मॉल हेल्थकेअर (१.१५%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (१. ९०%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (१.२५%), आयटी (१.५९%) निर्देशांकात झाली आहे.विशेषतः आज ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही मोठी घसरण झाली होती. आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ वर्धमान टेक्सटाईल लिमिटेड (१३.०३%), ओला इलेक्ट्रि क (७.९१%), जेपी पॉवर वेचंर (४.९९%), त्रिवेणी इंजिनिअरिंग (३.७०%), कल्याण ज्वेलर्स (२.३६%), टायटन कंपनी (१.२२%) समभागात झाले असून आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण अदानी गॅस (६.७९%), आदित्य बिर्ला फॅशन (५.४३%), इंटरग्लोब ए व्हिऐशन (५.३४%), साई लाईफ (५.२३%), पुनावाला फायनान्स (५.१०%), होम फर्स्ट फायनान्स (३.९७%), श्रीराम फायनान्स (३.८८%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय वस्तूंवरील कर लागू झाल्यानंतर निराशा पसरल्याने देशांतर्गत शेअर बाजार घसरले, ज्यामुळे गुंतवणूकदा रांच्या भावना मंदावल्या. कापूस आयात शुल्कात सूट मिळाल्याने कर परिणामांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक पाठबळ मिळण्याची आशा काही काळासाठी मावळली, ज्यामुळे दिवसाच्या आत अल्पकालीन पुनर्प्राप्ती झाली, परंतु गुंतवणूकदारांचा मूड नाजूक रा हिला, मोठ्या कॅपिटल शेअर्समध्ये घट झाली आणि जोखीम-ऑफ भावनांमुळे मध्यम आणि लहान कॅपिटल शेअर्सची कामगिरी चांगली झाली. अलिकडच्या नफ्यातून गुंतवणूकदारांनी नफा बुकिंगकडे वळल्याने ऑटो, आयटी, एफएमसीजी आणि धातूंसह बहुते क क्षेत्रे लाल रंगात व्यवहार करत होती, तर ग्राहकोपयोगी वस्तूंनी चांगली कामगिरी केली, जीएसटी सुसूत्रीकरण आणि सणासुदीच्या मागणीच्या अपेक्षांमुळे कदाचित त्यांना पाठिंबा मिळाला असेल.'

 
     
    




