सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीच्या शेअर मुळ किंमतीपेक्षाही घसरला
मोहित सोमण:मंगल इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेड (Mangal Electrical Industries Limited) कंपनीचा समभाग (Share) आज बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. मात्र शेअरला आज किरकोळ प्रतिसाद मिळाला आहे. किंबहुना कंपनीच्या शेअर्स मध्ये प्राईज बँड मूळ किंमतीपेक्षाही घसरण झाली आहे. २२ ऑगस्टला कंपनीच्या आयपीओचा अखेर दिवस होता. आज बाजार उघडल्यावरच कंपनीचा शेअर १% घसरला होता. दुपारी १ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर तब्बल ५.१७% कोसळला आहे. त्यामुळे कंपनी चा शेअर ५३२.५० रूपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. कंपनीने आपल्या आयपीओसाठी ५६१ व रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला होता.
४०० कोटींच्या या आयपीओला अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ९.९५ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ५.०९ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ११.०९ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १९.७८ वेळा सबस्क्रिप्शन मिळा ले होते. आज दुपारी २.१८ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ५.८१% कोसळल्याने प्रति समभाग (शेअर) किंमत ५२९.५५ रूपयांवर पोहोचली आहे. Systematix Corporate Services Limited या कंपनीने आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम केले असून Bigshare Services Pvt Ltd कंपनीने आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम केले होते. अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने यापूर्वीच १२० कोटी रुपये उभारले होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर थकबाकी चुकव ण्यासाठी, भांडवली खर्चासाठी, दैनंदिन कामकाजासाठी, खेळत्या भांडवलासाठी कंपनी करणार आहे.
एमईआयएल (Mangal Electrical Industries Limited) कंपनी CRGO विभागातील कंपनी मानली जाते.अहवाल दिलेल्या कालावधीत त्याच्या टॉप लाईन्समध्ये वाढ दिसून आली. कॅरी ओव्हर पुरवठ्यासाठी खर्च वाढल्याने, आर्थिक वर्ष 24 मध्ये त्याच्या नफा कमाईत घसरण झाली. या आर्थिक वर्षांपर्यंत कंपनीच्या महसूलात २२% वाढ इयर ऑन इयर बेसिसवर झाली होती. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये २६% वाढ झाली होती. मात्र आयपीओत व सूचीबद्ध होताना कंपनीच्या शेअरला सु रूवातीच्या कलात गुंतवणूकदारांनी नाकारले आहे.