राज ठाकरेंच्या निवासस्थानीही घेतले दर्शन
मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नुकताच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत पोहोचला होता.
आपल्या कुटुंबासह आलेल्या सचिनने पूर्ण भक्तीभावाने गणपतीचे दर्शन घेतले. यादरम्यान त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन देखील त्याच्यासोबत उपस्थित होते. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि लालबाग चा राजा हा मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक आहे. जिथे दरवर्षी लाखो गणेशभक्त दर्शनासाठी येतात.
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरही यावेळी उपस्थित होते.