
मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी विविध ठिकाणी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पोहोचली होती. जॅकलिनचा पार्थ पवारांबरोबरचा एक सोशल मिडियावर व्हायरल झाला. गणेशोत्सवात लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीही बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी जॅकलिन फर्नांडिस, अवनीत कौर व निर्माता राघव शर्मा यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. यावेळी तिथे पार्थ पवार उपस्थित होते. जॅकलिनने लालबागचा राजाचे चरणस्पर्श केले. तिथे आरती सुरू होती. तेव्हा पार्थ पवार यांनी आपल्या खिशातून काही नोटा काढल्या आणि जॅकलिनला दिल्या. पार्थ पवार यांनी आपल्या हातातील नोटा दानपेटीत टाकल्यानंतर जॅकलिनने पार्थ यांच्याकडून घेतलेल्या नोटा दानपेटीमध्ये टाकल्या. त्यानंतर जॅकलिन व पार्थ पवार बाप्पाचे चरण स्पर्श करून निघून गेले. पार्थ पवार यांनी जॅकलिनला खिशातून नोटा काढून दिल्या तो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पार्थ व जॅकलिन यांच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरद