Wednesday, August 27, 2025

गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धेचे आयोजन; प्रथम बक्षीस १ लाख रुपये

गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धेचे आयोजन; प्रथम बक्षीस १ लाख रुपये

मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवाला एक नवा आयाम देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एका अभिनव रील स्पर्धेचे आयोजन. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ करणार आहे.

सहभागासाठी ३ गट आणि महत्त्वाच्या तारखा

ही स्पर्धा राज्याच्या महसूल विभागीय स्तर, राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेरील तसेच भारताबाहेरील अशा तीन गटांमध्ये होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून आपला रील अपलोड करायचा आहे.

स्पर्धेचे विषय आणि नियम

विषय:पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, आणि 'ऑपरेशन सिंदूर' हे स्पर्धेचे मुख्य विषय आहेत. वेळमर्यादा:स्पर्धकांना ३० ते ६० सेकंदांचा रील बनवायचा आहे.

आकर्षक बक्षिसे

या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची आकर्षक बक्षिसे दिली जातील

महसूल विभागीय स्तर: प्रथम क्रमांक: २५,००० रुपये द्वितीय क्रमांक: १५,००० रुपये तृतीय क्रमांक: १०,००० रुपये उत्तेजनार्थ: ५,००० रुपये

राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर/भारताबाहेर (खुला गट) प्रथम क्रमांक: १ लाख रुपये द्वितीय क्रमांक: ७५,००० रुपये तृतीय क्रमांक: ५०,००० रुपये उत्तेजनार्थ: २५,००० रुपये

नोंदणी प्रक्रिया

या स्पर्धेसाठी नोंदणीकरिता गुगल फॉर्म उपलब्ध आहे. स्पर्धकांनी filmcitymumbai.org या संकेतस्थळावर किंवा महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवर भेट देऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment