Wednesday, August 27, 2025

Ambani Family Welcomes Bappa: राधिका अनंत अंबानीने केले 'अँटिलिया चा राजा'चे भव्य स्वागत

Ambani Family Welcomes Bappa: राधिका अनंत अंबानीने केले 'अँटिलिया चा राजा'चे भव्य स्वागत
मुंबई: आज देशभरात गणेश चतुर्थीचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही हा सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करतात, आणि यंदाही बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी उत्सवात सहभाग घेतला आहे.याचसोबत अंबानी कुटुंबातही ‘एंटीलियाचा राजा’ मोठ्या थाटात आणण्यात आला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि त्याची पत्नी राधिका मर्चंट यांनी त्यांच्या मुंबईतील घर एंटीलिया मध्ये गणपती बाप्पाचं भव्य स्वागत केलं, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दोघेही पारंपरिक पोशाखात दिसून येतात. दोघंही बाप्पांच्या स्वागतात गुंतलेले असून आजूबाजूला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळते. बाप्पांना आणणारा ट्रक फुलांनी सुरेख सजवलेला दिसतो. संपूर्ण एंटीलिया रंगीबेरंगी लाईट्स आणि फुलांनी सजवण्यात आले असून मुंबई पोलिसांचंही बंदोबस्त ठेवण्यात आलं होता. सोशल मीडियावर ‘एंटीलियाचा राजा’च्या स्वागताचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनंत आणि राधिका बाप्पांच्या स्वागतासाठी उभे दिसतात आणि नंतर कारमधून पुढे निघून जातात. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एंटीलियाच्या आतल्या भागाची झलक पाहायला मिळते, ज्यामध्ये अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका मेहता बाप्पांच्या स्वागताच्या प्रतिक्षेत दिसते.
  अंबानी कुटुंबासारखेच अनेक बॉलिवूड कलाकारांनीही गणपती बाप्पाचं मोठ्या थाटात स्वागत केलं. सोनू सूद, भारती सिंग, हंसिका मोटवानी, अंकिता लोखंडे, पराग त्यागी, युविका चौधरी यांसारख्या अनेक कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना घरी आणलं.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >