Sunday, October 26, 2025
Happy Diwali

जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडोच्या संख्येने मराठा समूह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हाती आलेल्या महितीनुसार जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून निघाले असून, थोड्याच वेळात ते शहागड येथे दाखल होणार आहेत‌.आशाप्रकारे ते येत्या २८ ऑगस्ट रोजी ते मुंबईत पोहोचणार आहेत. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे आंदोलन करणार आहेत.

सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना, ठरल्याप्रमाणे २८ ऑगस्ट रोजी मराठा समूह मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वाहतूक व्यवस्था आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे आहे. सध्या जरांगे पाटलांना ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, ते ज्या ज्या मार्गाहून जाणार आहेत, तिथे त्यांचे स्वागत होताना दिसून येत आहे.

नुकतीच हातात आलेल्या माहितीनुसार, जरांगे शहागड येथे पोहोचणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठा क्रेन उभा करण्यात आला असून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. यानंतर ते शहागड मधून पैठण आणि पुढे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

कसा असेल प्रवास?

मनोज जरांगे पाटील वडीगोद्री फाट्यावरून मुंबईकडे रवाना होत आहे. त्यांचा पहिला मुक्काम हा जुन्नर येथे होणार आहे. शहागडवरून हा मोर्चा जुन्नरकडे जाणार आहे. पुढे मुंबईत हा मोर्चा दाखल होईल.

Comments
Add Comment