Gold Smuggling: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई... १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त!

मुंबई: कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सदर व्यक्ती हा सौदी अरेबियाहून आला असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील कस्टम विभागाने सौदी अरेबियाहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला अटक केली आहे. त्यानंतर त्याची झडती घेण्यात आली आणि त्याच्याकडून मेणाच्या स्वरूपात २४ कॅरेट सोन्याची धूळ जप्त करण्यात आली. ज्याचे वजन १.०७ किलो आहे आणि त्याची किंमत १.०२ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.

कस्टमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेले सोने हे प्रवाशाच्या शरीरात लपवलेले आढळले. गुप्त माहितीच्या आधारे, मुंबई कस्टमच्या विमानतळ आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला थांबवले. हा प्रवासी सौदी अरेबियातील जेद्दाह येथून आला होता. झडती दरम्यान त्यांना सदर व्यक्तीच्या शरीरात लपवलेले सोन्याचे मेण सापडले. त्यानंतर प्रवाशाला सीमाशुल्क कायद्याच्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासेही होऊ शकतात.

मुंबई विमानतळावर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही डीआरआयने गेल्या काही दिवसांपूर्वी कारवाई करताना एका व्यक्तीला अटक केली होती. अटक केलेल्या व्यक्तीकडून कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.
Comments
Add Comment

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)