Eknath Shinde: रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या बाईकस्वाराच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री, ताफा थांबवून केली मदत

ठाणे: आज सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर एक अपघात घडला. एक तरुण बाइकस्वार जखमी अवस्थेत रस्त्यावर बसलेला शिंदे यांना दिसला. त्यावेळी त्यांनी कोणताही विलंब न करता, स्वतः त्याची विचारपूस करत रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला आहे. नेमके काय आहे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.


आज सकाळी किसन नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे हे घरोघरी दीड दिवसांच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आपल्या ताफ्यासोबत ठाणे शहरात फिरत होते. संध्याकाळी त्यांचा ताफा घोडबंदर रोडवर आला असता त्यांना एका तरुणाची बाईक स्लिप होऊन रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली.  त्यावेळी, शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून गाडीतून उतरून या जखमी तरुणाची विचारपूस केली. त्यावेळी या तरुणाने आपली दुचाकी घसरल्याने आपल्या खांद्याला दुखापत झाल्याचे त्यांना सांगितले. यावेळी त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील अँब्युलन्स पुढे घेत या तरुणाला त्यात घालून त्याला तत्काळ घोडबंदर रोडवरील होरायझन प्राईम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. तसेच आपल्या ताफ्यातील एक अधिकारी त्याची देखरेख करण्यासाठी दिला.


घरोघरी आज श्री गणेशाचे आगमन झाले असल्याने विघ्नहर्ता घरोघरी विराजमान झाल्याची भावना लोकांमध्ये आहे. अशात जखमी तरुणाच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील या तरुणासाठी खरे विघ्नहर्ता ठरले आहेत, असा कौतुकांचा वर्षाव शिंदे यांच्यावर होत आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या