Tuesday, August 26, 2025

Stock Market: सकाळच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीची घसरगुंडी जागतिक अस्थिरता बाजाराच्या मुळाशी 'हे' आहेत आजचे सिग्नल जाणून घ्या विश्लेषण

Stock Market: सकाळच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीची घसरगुंडी जागतिक अस्थिरता बाजाराच्या मुळाशी 'हे' आहेत आजचे सिग्नल जाणून घ्या विश्लेषण

मोहित सोमण:आज सकाळच्या सत्रात घसरणच अपेक्षित आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीतील घसरणीनंतर आजही बाजारात जागतिक दबाव जाणवू शकतो. आज सकाळच्या सत्राच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स ५८९.३६ व निफ्टी १७६.०५ अंकाने घसरला आहे. सत्रा च्या सुरुवातीलाच सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४८३.८० अंकाने व बँक निफ्टीत ५१४.०५ अंकाने घसरण झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९५%,१.२३% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.१८%,१.३४% घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) सकाळच्या सत्रात एफएमसीजी (०.२२%) वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण हेल्थकेअर (१.६०%), रिअल्टी (१.१४%), फार्मा (१.५६%), मिडस्मॉल हेल्थ केअर (१.६०%), फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (१.१३%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.३२%), मेटल (१.०९%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली.

विशेषतः युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेड गव्हर्नर लिसा कुक यांची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हकालपट्टी केली आहे. त्यामुळे युएस बाजारातील वातावरण विचलित झाले. दुसरीकडे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का? या विचाराने अस्थिरतेचे घर निर्माण केल्याने युएस बाजारात अस्थिरता निर्माण केली आहे. रशिया व युएस यांच्यातील बोलणीवरही अद्याप तोडगा निघालेला नाही. युएसने युक्रेन विरूद्ध युद्धविरामाच्या बदल्यात अतिरिक्त निर्बंध काढण्याची पाऊले उचलली होती. ट्रम्प यांनी पुतीन यांच्या भेटीपूर्वी रशियाने युद्धविराम न केल्यास आणखी एक कडक आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी दिली होती. अद्याप त्यावर तोडगा निघाला नसला तरीही आगामी काळात युद्धविराम होऊ शकतो अशा आशावादाने जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या किंमतीत आज घसरण झाली आहे. याच आशावादामुळे आज जागतिक सोन्याच्या निर्देशांकातही घसरण झाली त्यामुळे भारतीय बाजारातही आज सोन्यात घसरण झाली. याशिवाय ट्रम्प यांनी चीनने दुर्मिळ धातूची निर्यात केली नाही तर २००% टॅरिफची धमकी दिली आहे. त्यामुळे बाजार आणखी अस्थिर झाला.

एमसीआय एशिया पॅसिफिक इंडेक्स (MSCI) ०.७% घसरला असून काल संपूर्ण युएस बाजारात घसरण झाली आहे. डाऊ जोन्स (०.०९%), एस अँड पी ५०० (०.४३%), नासडाक (०.२२%) या तिन्ही बाजारात घसरण झाली आहे. युरोपियन बाजारात एफटीएसई (०.१३%) बाजारात वाढ झाली असून सीएएसी (१.६१%), डीएएक्स (०.३७%) बाजारात घसरण झाली आहे. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.७१%) सह निकेयी २२५ (०.९०%), स्ट्रेट टाईम्स (०.३३%), हेंगसेंग (०.२६%), तैवान वेटेड (०.२१%), कोसपी (०.९०%), सेट कंपोझिट (०.२६%), जकार्ता कंपोझिट (०.०६%) बाजारात घसरण झाली असून केवस सकाळी शांघाई कंपोझिट (०.११%) बाजारात वाढ झाली.

सकाळच्या सत्राच्या सुरुवातीला बीएलएस इंटरनॅशनल (२.९६%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (२.१४%), कोलगेट पामोलीव (१.४६%), जिंदाल स्टेन (१.४६%), एल टी फूडस (१.२८%), नेस्ले इंडिया (१.२७%), विशाल मेगामार्ट (१.२५%), सुंदरम फायनान्स (०.९४%), अव्हेन्यू सुपरमार्ट (०.८३%), आदित्य बिर्ला फॅशन (०.७३%), सन टीव्ही नेटवर्क (०.७०%), समभागात झाली आहे.

सकाळच्या सत्राच्या सुरुवातीला वोडाफोन आयडिया (६.६२%), वेदांता (४.१९%), झायडस लाईफ सायन्स (३.५३%), साई लाईफ (३.३८%), टीबीओ टेक (३.३७%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (३.२३%), इंडस टॉवर (३.१६%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (३.१३%), पिरामल एंटरप्राईजेस (२.८१%), ग्रावीटा इंडिया (२.७६%), सन फार्मा (२.४६%), माझगाव डॉक (२.३७%), अदानी ग्रीन (२.३१%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (२.१३%), लेमन ट्री हॉटेल (२.०३%), भारती हेक्साकॉम (१.७९%), बँक ऑफ इंडिया (१.४४%), रामकृष्ण फोर्ज (१.३७%),एचडीएफसी बँक (१.१५%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.७७%) समभागात झाली आहे.

आज सकाळच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' काल २५०००/२५०३३ झोन क्षेत्राच्या वर बंद होण्यास असमर्थता दर्शवते की खरेदीदार जास्त किम तींचा पाठलाग करण्यास उत्सुक नाहीत. यामुळे घसरणीला वाव मिळतो. जर निफ्टी २४८७० पातळीच्या खाली घसरला तर वाढीची शक्यता कमी होऊ शकते, परंतु नकारात्मक खेळ सुरू करण्यासाठी २४७४० पातळीच्या खाली थेट घसरण आवश्यक आहे.'

आजच्या सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्राईम रिसर्च हेड देवार्ष वकील म्हणाले आहेत की,'सोमवारी अमेरिकेतील शेअर बाजार घसरले, प्रमुख सरासरी निर्देशांकांनी मंद कामगिरी दाखवली आ णि नंतर बंद होण्याच्या दिशेने दबाव आला. गेल्या शुक्रवारी फेड-इंधनयुक्त तेजीमुळे डाओ विक्रमी उच्चांकावर पोहोचला, त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा मिळवला, त्यामुळे एस अँड पी ५०० ०.४% घसरले आणि डाओ ३०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. शुक्रवारी जेरोम पॉवेलच्या जॅक्सन होलच्या डोविश भाषणामुळे सप्टेंबरमध्ये दर कपातीच्या अपेक्षा पुन्हा जिवंत झाल्या. तथापि, सोमवारच्या सत्रात एकत्रीकरण दिसून आले कारण आशावाद सावधगिरीला पर्याय ठरला, आगामी महागाई डेटा आणि फेड कम्युनिकेशन्सवर लक्ष केंद्रित केले गेले. एस अँड पी ५०० चा सर्वात मोठा घटक एनव्हीडिया, एआय चिप मागणीसाठी उच्च अपेक्षांदरम्यान बुधवारी तिमाही निकाल जाहीर करेल. एप्रिलच्या नीचांकी पातळीपासून दुप्पट झालेल्या आणि वर्षभरात ३२% वाढलेल्या या स्टॉकने गुंतवणू क दारांनी व्यापक एआय कथेच्या तुलनेत कमाईच्या जोखमीचे वजन केले, त्यामुळे गुंतवणूकदारांनी या बारकाईने पाहिल्या जाणाऱ्या रिलीजपूर्वी टेक स्टॉक अस्थिर राहिले. एआय आणि तंत्रज्ञानाच्या भावनेसाठी एक घंटा म्हणून पाहिले जात आहे.

या आठवड्यात होणाऱ्या महत्त्वाच्या घटनांपूर्वी व्यापारी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास कचरत असल्याचे दिसून आले, ज्यामध्ये एनव्हीडियाचे उत्पन्न आणि शुक्रवारीचा वाणिज्य विभागाचा अहवाल समाविष्ट आहे ज्यामध्ये फेडचा पसंतीचा महागाई अहवाल समा विष्ट आहे. बाजार टिकाऊ वस्तूंच्या ऑर्डर, ग्राहकांचा विश्वास आणि दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीवरील डेटावर देखील लक्ष ठेवतील. आर्थिक आघाडीवर, वाणिज्य विभागाने जुलैमध्ये नवीन घरांची विक्री ०.६% घसरून ६५२,००० पातळीच्या वार्षिक दराने झाली असल्याचे नोंदवले आहे, जूनमध्ये ४.१% वाढ होऊन ६५६००० झाली होती. अर्थशास्त्रज्ञांच्या ०.५% वाढून ६३०००० होण्याची अपेक्षा या घसरणीने चुकली.पॉवेलच्या टिप्पण्यांमुळे गेल्या आठवड्यात मोठी विक्री झाल्यानंतर अमेरिकन डॉलरमध्ये थोडीशी वाढ झाली. अमेरिकेने अलीकडेच निवडक भारतीय निर्यातीवर ५०% कर लागू करण्याची सूचना दिल्याने व्यापार धोरण अनिश्चितता कायम आहे. सुट्टीच्या काळात कमी झालेल्या आठवड्याच्या पहिल्या सत्रात, जागतिक संकेतांमुळे निफ्टी ९७ अंकांनी (०.३९%) वाढून २४९६७ पातळीवर बंद झाला. श्री गणेश चतुर्थी उत्सव साजरा करण्यासाठी उद्या बाजार बंद राहतील.

निर्देशांकाने आतील बार कॅंडलस्टिक पॅटर्न (Inside Bar Candlestick Pattern) तयार केला, जो अलिकडच्या घसरणीनंतर थांबण्याचे संकेत देतो. अशा पॅटर्नमध्ये सामान्यतः कमी अस्थिरता टप्पे असतात जे बहुतेकदा तीक्ष्ण दिशात्मक हालचालींपूर्वी असता त.२५०८४ पातळीच्यावर सतत ब्रेक गेल्या दोन सत्रांमधील उच्चांक तेजीच्या उलटतेची (Confirm Bullish Reversal) पुष्टी करेल. नकारात्मक बाजूने, २० आणि ५०- DEMA (Double Exponential Moving Average DEMA) २४८४७ पातळीच्या जवळ एकत्रित (Consolidation) होईल. निफ्टीसाठी तात्काळ आधार राहील.कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार मंदावले जातील अशी अपेक्षा आहे.'

त्यामुळे आजही तज्ञांच्या मते बाजार खालावला जाऊ शकतो. याशिवाय निफ्टी क्षेत्रीय विशेष निर्देशांकात घसरणीसह मिड स्मॉल कॅप, बँक, मेटल, तेल व गॅस, फार्मा, हेल्थकेअर या सगळ्याच समभागात ब्रेक आऊट झाल्याने आज घसरण झाली. जागतिक दबाव व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा नकारात्मक कौल व घरगुती गुंतवणूकदारांकडून आगामी नफा बुकिंग (Profit Booking) या घटनांचा एकत्रित परिणाम म्हणून बाजारात अखेरच्या सत्रातही घसरणीची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment