
अहमदाबाद:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी भारतातील पहिली सुझुकी ईव्ही ई विटारा (e- VITARA) कारचे उद्घाटन केले आहे. सुझुकी कंपनीच्या अहमदाबाद येथील प्रकल्पात हा कार्यक्रम पार पडला. जगातील प्रथम बीईवी (Battery Electric Vechile BEV) कारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. भारतातील ही प्रथम 'मेड इन इंडिया' कार १०० पेक्षा अधिक देशांना निर्यात केली जाऊ शकते असे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लिथियम आयर्न बँटरी (Lithium Iron Battery) च्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प देखील सुझुकी, तोशिबा, डेनसो यांच्याकडून संयुक्तपणे सुरू झाला आहे. हायब्रिड, व इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) अशा दोन्ही प्रकारच्या बॅटरीचे उत्पादन या क्षेत्रात होणार आहे. मुख्यतः या बॅटरी इले क्ट्रिक व्हेईकल जपान, युरोपसह अनेक देशात निर्यात केली जाणार असल्याचे अहवालात नमूद केले गेले होते.
तत्पूर्वी पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले होते की,'२६ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता, पंतप्रधान अहमदाबादमधील हंसलपूर येथे हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादनाचे उद्घाटन करतील आणि १०० देशांमध्ये बॅटरी इलेक्ट्रिक वाहनां च्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.' पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाप्रसंगी बोलताना म्हटले आहेत की,'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड ही विकसित भारत २०४७ च्या दृष्टिकोनाकडे एक मोठी झेप आहे. आजपासून, भारतात बनवलेल्या ईव्हीजची जागतिक स्तरावर निर्यात केली जाईल आणि हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादन देखील सुरू होईल. हा दिवस भारत आणि जपानच्या मैत्रीतील एक नवीन मैलाचा दगड आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मी सर्व देशवासीयांचे, सुझुकी आणि जपानचे अभिनंदन करतो.'
e- VITARA ही एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही असणार आहे असे कंपनीने म्हटले आहे. भविष्यकालीन डिझाइन आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह ती ४९ किलोवॅट प्रति तास आणि ६१ किलोवॅट प्रति तास असे दोन बॅटरी पर्याय देते. माहितीनुसार, कारची ड्रायव्हिं ग रेंज प्रति चार्ज ५०० किमी पर्यंत आहे. बॅटरी पॅकवर अवलंबून, पॉवर आउटपुट सुमारे १४२ ते १७२ बीएचपी पर्यंत आहे.ही एसयूव्ही तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे, ज्यामध्ये १०.२५-इंच टचस्क्रीन, वायरलेस कनेक्टिव्हिटी, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अँम्बियंट लाइटिंग आ णि लेव्हल २ अँडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), जे मारुतीसाठी उद्योगातील पहिले तंत्रज्ञान आहे असेही अहवालात म्हटले होते.
सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये (Safety Features) मध्ये ७ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि ३६०-डिग्री कॅमेरा सेटअप देखील समाविष्ट आहे. ई-विटारा या वर्षी सप्टेंबरच्या सुमारास भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे, ज्याची किंमत १७ लाख ते २२.५ लाख रुपयांच्या दरम्यान असेल असे म्हटले जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २५ मध्ये, मारुती सुझुकीने देशांतर्गत १९.०१ लाख युनिट्स विकल्या आणि जागतिक स्तरावर ३.३२ लाखांहून अधिक वाहनांची निर्यात केली. ई-विटाराचे उत्पा दन हे कंपनीच्या ईव्हीमध्ये विस्ताराच्या पुढील टप्प्याचे चिन्ह आहे, ज्याला चार प्लांटमध्ये २.६ दशलक्ष युनिट्सची क्षमता असलेल्या मोठ्या उत्पादन फूटप्रिंटचे पाठबळ असल्याचे स्पष्ट झाले होते.