Patel Retail शेअरला पहिल्याच दिवशी तुल्यबळ प्रतिसाद थेट 'इतक्या' टक्के प्रिमियम दरासह सुरु आहे शेअर

मोहित सोमण:पटेल रिटेल लिमिटेडचा शेअरला तुल्यबळ प्रतिसाद मिळाला आहे. सकाळीच कंपनीचा सत्राच्या सुरुवातीलाच १७.६५% उसळला होता त्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत २४२.७६ रूपयांवर पोहोचली होती. आज कंपनीचा शेअर बाजारात सूची बद्ध (Listed) झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी १५ ते १७% प्रिमियम दरासह समभागांना (Stocks) प्रतिसाद दिला. सकाळी १२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १५% वाढ झाल्याने कंपनीचा शेअर २९३.२५ रूपयांवर ट्रेड करत आहे. पटेल रिटेल कंपनीचा आयपीओ १९ ते २१ ऑगस्टपर्यंत बाजारात दाखल झाला होता. आजपासून तो बीएसई व एनएसईत सूचीबद्ध झाला आहे. प्राईज बँड प्रति शेअर २५५ रूपयांवर निश्चित झाला होता. आता तो २९३ ते २९५ पट्ट्यात ट्रेड करत आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ५८ शेअरची खरेदी आयपीओत अनिवार्य करण्यात आली होती.


या आयपीओमध्ये ८५.१८ लाख नवीन इक्विटी शेअर्स जारी करून २४२.७६ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट होते, जे एकूण २१७.२१ कोटी होते आणि प्रमोटर्स धनजी राघवजी पटेल आणि बेचर राघवजी पटेल यांनी २५.५५ कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (ओएफ एस) सादर केला होता. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मिळालेल्या निधीचा वापर कर्ज मंजुरी, सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आणि खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी निधी वापरण्याचा हेतू आहे असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले होते. शेवटच्या दिवसासह ए कूण आयपीओ तब्बल ९५.७० वेळा सबस्क्राइब करण्यात आला होता ज्यामध्ये ७८१५६१२ शेअर्सच्या तुलनेत ७४७९८९४६० शेअर्ससाठी बोली (Bidding ) tलावण्यात आल्या होत्या. २००८ मध्ये स्थापन झालेली अंबरनाथ स्थित पटेल रिटेल लिमिटेड ही एक रिटे ल सुपरमार्केट साखळी (Supermarket Chain) आहे जी प्रामुख्याने तृतीय श्रेणीतील शहरे आणि जवळच्या उपनगरीय भागात कार्यरत आहे. या स्टोअरमध्ये अन्न, अन्न नसलेले (एफएमसीजी), सामान्य वस्तू आणि कपडे यासह विविध प्रकारच्या उत्पादनांची उपलब्धता आहे.


कंपनीने महाराष्ट्रातील अंबरनाथ येथे 'पटेल्स आर मार्ट' या ब्रँड नावाने आपले पहिले स्टोअर उघडले होते. ३१ मे २०२५ पर्यंत कंपनीने महाराष्ट्रातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या उपनगरीय भागात ४३ स्टोअर्स चालवले, ज्यांचे एकूण रिटेल क्षेत्र अंदाजे १७८९४६ चौरस फूट आहे. कंपनीच्या आर्थिक वर्षातील महसूलात १% वाढ झाली असून करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये १२% वाढ झाली होती.आयपीओपूर्वी, कंपनीने चाणक्य अपॉर्च्युनिटीज फंड, मेबँक सिक्युरिटीज, बीकन स्टोन कॅपिटल, बीएनपी परि बास फायनान्शियल मार्केट्स, सेंट कॅपिटल फंड आणि पाइन ओक ग्लोबल फंड यासारख्या अँकर गुंतवणूकदारांकडून ₹४३.४६ कोटी जमा केले.

Comments
Add Comment

Stock Market: अखेरच्या दिवशी प्रथम सत्रात शेअर बाजारात उसळलेच ! 'या' कारणांमुळे रॅली सेन्सेक्स १६६.३२ व निफ्टी ३१.८५ अंकांने उसळला

मोहित सोमण:आज आठवड्यातील अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात शेअर बाजारात वाढ झाली आहे. प्रामुख्याने बँक

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीत तुमचं नाव आहे का? येथे शोधा...

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण

TCS Q2 Results: जागतिक अस्थिरतेही Tata Consultancy Services आर्थिक निकाल सकारात्मक कंपनीच्या एकत्रित नफ्यात 'इतक्याने' वाढ

प्रतिनिधी:देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने (Tata Consultancy Services Limited) आपला आर्थिक वर्ष २०२६ दुसरा तिमाही निकाल जाहीर

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या